जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 05:00 IST2021-03-24T05:00:00+5:302021-03-24T05:00:37+5:30

लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा व लस घेणाºया व्यक्तींना वापरता येतो. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात आॅपलाईन व आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातील को-विन अ‍ॅप नोंदणी करणाºयांची संख्या अत्यल्प होती. मात्र, १ मार्चपासून वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.

The number of vaccination centers will be increased in the district | जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार

जिल्हाभरात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविणार

ठळक मुद्देकेंद्र सरकारच्या घोषणेचा परिणाम : ६९ केंद्रांमधून लसीकरण सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : बहुप्रतिक्षित ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा डोस सोमवारी ३५ जणांनी घेतला. यामध्ये ११ आरोग्य कर्मचारी व २४ ज्येष्ठ नागरिक व सहव्याधी व्यक्तींचा समावेश आहे. ही लस देण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकच केंद्र सुरू झाले. १ एप्रिल २०२१ पासून ४५ वर्षांच्या पुढील सर्व नागरिकांना लस मिळणार, अशी घोषणा केंद्रीय मंत्र्यांनी आज घोषणा केली. याबाबतच आदेश मिळाला नाही. मात्र, पूर्वतयारी म्हणून केंद्रांची संख्या वाढविण्याच्या हालचाली जिल्हा प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
जिल्ह्यात सध्या ६९ केंद्रांवर लसीकरण सुरू आहे. आरोग्यसेवक, कोरोना योद्धा,४५ वर्षांवरील व्याधीग्रस्त व ६० वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण आता अंतिम टप्प्यात आहे. जिल्ह्यातील सर्व केंद्रांना कोविशिल्डचे ४० हजार डोस वितरीत करण्यात आले होते. 

को-विन अ‍ॅपवर वाढली नोंदणी
लसीकरण मोहीमेसाठी को-विन नावाचा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात आला. हा प्लॅटफॉर्म लसीकरण मोहीम राबवणारी यंत्रणा, लस देणारी आरोग्य सेवा व लस घेणाºया व्यक्तींना वापरता येतो. जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रात आॅपलाईन व आॅनलाईन नोंदणीची व्यवस्था करण्यात आली. सुरूवातील को-विन अ‍ॅप नोंदणी करणाºयांची संख्या अत्यल्प होती. मात्र, १ मार्चपासून वाढल्याची माहिती जिल्हा आरोग्य प्रशासनाने दिली.

बुस्टर डोस कालावधीत बदल
१३ मार्चला कोव्हॅक्सिनचे ४ हजार ८०० डोज जिल्ह्याला मिळाले. मंगळवारी पहिल्या दिवशी ३५ जणांनी डोस घेतला. दरम्यान, लशीच्या दोन डोसांमधील अंतर केंद्र सरकारने वाढविल्याच्या सूचना जारी केल्या. त्यामुळे पूर्वी २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस घेणाºयांना आता ४ ते ६ आठवड्यांपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.

लसीकरणासाठी लागणारे पुरावे
मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, मनरेगा रोजगार कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, पेन्शनची कागदपत्रे यापैकी कोणताही एक पुरावा लसीकरण व नोंदणीसाठी स्वीकारला जातो.

Web Title: The number of vaccination centers will be increased in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.