फेऱ्यांमध्ये एकआकडी संख्या मिळविणाऱ्यांची संख्या अधिक
By Admin | Updated: October 19, 2014 23:51 IST2014-10-19T23:51:18+5:302014-10-19T23:51:18+5:30
चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी आपले नशीन अजमावले. यातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांनी ३० हजारावर मताधिक्क मिळवून यश मिळविले. पहिल्या फेरीपासूनच नाना शामकुळे

फेऱ्यांमध्ये एकआकडी संख्या मिळविणाऱ्यांची संख्या अधिक
चंद्र्रपूर : चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात १३ उमेदवारांनी आपले नशीन अजमावले. यातील भाजपाचे उमेदवार नाना शामकुळे यांनी ३० हजारावर मताधिक्क मिळवून यश मिळविले. पहिल्या फेरीपासूनच नाना शामकुळे यांचे मताधिक्क इतरांपेक्षा वाढत होते. केवळ १६ व्या फेरीमध्ये शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांनी लिड घेतली. काही फेऱ्यांमध्ये बहुतांश उमेदवारांची दोनअंकी संख्याही पार करता आली नाही.
रविवारी सकाळी मतमोजनी सुरु झाली. पहिल्या फेरीमध्ये नाना शामकुळे यांना ३ हजार ७४ मत मिळाले. तर जोरगेवार यांना १४२८, नागापूरे ४१८, मेंढे यांना १३७९ मत मिळाली. पहिल्या फेरीपासून तर १६ व्या फेरीपर्यंत शामकुळे यांचे इतरांच्या तुलनेत मताधिक्य वाढत होते. १६ व्या फेरीमध्ये किशोर जोरगेवार यांनी ४ हजार ६२२ तर शामकुळे यांना ३ हजार १४२ मत मिळाले. अशोक नागापूरे यांना ३२२, काँग्रेसचे मेंढेना १२०२ मते मिळाली.
या निवडणुकीमध्ये भाजपाचे नाना शामकुळे यांना ८१ हजार ४८३ मते मिळाली. तर शिवसेनेचे किशोर जोरगेवार यांना ५० हजार ७११, कांँग्रेसचे मेंढे यांना २५१४०, राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक नागापुरे ७ हजार ४५९, भारिप बहुजन महासंघाचे अनिरुद्ध वनकर यांना १४ हजार ६८३ मतांवर समाधान मानावा लागले.
तर बहुजन मुक्ती पार्टीचे प्र्रकाश शंकर रामटेके यांना ५५२, अपक्ष उमेदवार मिलिंद दहिवडे यांना ७१८, आंबेडकरराईट पार्टी आॅफ इंडियाचे रविंद्रनाथ पाटील ४१३, अपक्ष चिन्नाजी नलबोगा १६९८, अपक्ष प्रफुल्ल खोब्रागडे ४३०, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सुनिता गायकवाड यांना १ हजार २८८, बहुजन समाज पार्टीचे अंकलेश खैरे ८ हजार ३५७ तर रिपब्लिक पार्टी आॅफ इंडिया ए. चे प्रमोद सोरते यांना २२७ मते मिळाली.
विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये १३ उमेदवारांपैकी तब्बल पाच उमेदवारांना तीन आकडी संख्याही पार करता आली नाही. तर चार आकडी मतदानाची संख्या चार उमेदवारांनी घेतली आहे. राष्ट्रवादीचे चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात त्यांना केवळ ७ हजार ४५९ मतांवर समाधान मानावे लागले. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला चंद्रपूर विधानसभा क्षेत्रामध्ये केवळ १ हजार २८८ मते मिळाले.