मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:42 IST2021-02-05T07:42:34+5:302021-02-05T07:42:34+5:30
मोकाट जनावरांचा त्रास सावली : शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक वॉर्डांमध्ये मोकाट जनावरे उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत ...

मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्या वाढली
मोकाट जनावरांचा त्रास
सावली : शहरातील मुख्य रस्त्यावर तसेच अनेक वॉर्डांमध्ये मोकाट जनावरे उभे राहतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होत आहे. जनावरांमुळे किरकोळ अपघातही घडत आहेत. त्यामुळे शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी आहे.
गावातील कट्टे पुन्हा गजबजले
चंद्रपूर : लॉकडाऊननंतर गावाच्या पहारावर तसेच चौकाचौकात नागरिकांच्या चर्चेवर प्रतिबंध आला आहे. त्यामुळे इतर वेळी सायंकाळी तसेच सकाळी चर्चा करण्यासाठी येणारे नागरिक आता घरात राहणे पसंत करीत होते. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्यामुळे नागरिक चर्चेसाठी चौकाचौकात तसेच गावातील कट्ट्यांचा वापर करीत आहे. विशेष म्हणजे, सरपंच आरक्षण अद्यापही निघाले नसल्याने कोण सरपंच होणार, यावर चर्चा रंगत आहे.
कामगारांना सुरक्षा किट द्यावी
चंद्र्रपूर : सफाई कर्मचारी जीव धोक्यात घालून स्वच्छतेचे कर्तव्य बजावत आहेत. परंतु काही कामगारांना अद्यापही स्वच्छतेचे किट पुरविले नाही. त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा किट द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
बीएसएनएल नेटवर्कअभावी ग्राहक त्रस्त
चंद्रपूर : दुर्गम भागात बीएसएनएलचे अत्यंत कमी टॉवर आहेत. त्यामुळे या परिसरातील भ्रमणध्वनींना कव्हरेज मिळत नाही. बीएसएनएलचे मोठ्या प्रमाणात ग्राहक असून जास्तीत जास्त टॉवर उभारण्याची आवश्यकता आहे. मागील बऱ्याच दिवसापासून समस्या गंभीर बनली आहे. ग्राहकांना चांगली सेवा द्यावी, अशी मागणी होत आहे.