रुग्णसंख्येने ओलांडला साडेचोवीस हराजांचा टप्पा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:22+5:302021-03-15T04:26:22+5:30
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वर्षभरानंतरही कायमच आहे. जिल्ह्यात २ मे ला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळूहळू ...

रुग्णसंख्येने ओलांडला साडेचोवीस हराजांचा टप्पा
चंद्रपूर : जिल्ह्यात कोरोनाचे संकट वर्षभरानंतरही कायमच आहे. जिल्ह्यात २ मे ला पहिला कोरोना रुग्ण आढळला होता. त्यानंतर हळूहळू हा कोरोना रुग्णांचा आकडा वाढत सध्या २४ हजार ७७८ वर जावून पोहचला आहे. मधल्या काळात रु्णसंख्या तसेच मृत्यूसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. वर्षभरामध्ये ४०२ जणांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला. विशेष म्हणजे, यामध्ये तरुणांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे.मार्च २०२० पासून लाॅकडाऊन करण्यात आले. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पहिला रुग्ण २ मे रोजी आढळला तर पहिला मृत्यू ऑगस्टमध्ये नोंदविला गेला. प्रत्येक रुग्णांवर योग्य उपचार करून आरोग्य यंत्रणेने प्रत्येकांची काळजी घेत शर्थीचे प्रयत्न केले. मात्र औषधोपचाराला साथ न दिल्याने या रुग्णांचा मृत्यू झाला.
दरम्यान, आता पुन्हा कोरोनाने तोंड वर काढले आहे. बरे होणाऱ्यांपेक्षा रुग्णांची संख्या अधिक वाढत आहे. त्यामुळे लाॅकडाऊन होते की, काय अशी अवस्था सध्या झाली आहे. जिल्ह्यात सध्या ९०५ रुग्णांवर उपचार सुरु आहे. यामध्ये ५४८ होम आयसोलेशनमध्ये आ. तर सहा रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. स्थिर असलेले रुग्ण ३११ आहे. अन्य रुग्णांवरही उपचार सुरु आहे. जिल्ह्यात आजपर्यंत रुग्णसंख्या
२४ हजार ७७८ वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ४७१ झाली आहे. आतापर्यंत दोन लाख ३१ हजार ९२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी दोन लाख पाच हजार २७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.
बाॅक्स
०२ मे २०२०
रोजी जिल्ह्यातील पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला
२४,७७८- कोरोनाचे एकूण रुग्ण
२३४७२ -बरे झालेले रुग्ण
४०२- एकूण कोरोना बळी
९०५- सध्या उपचार सुरु
११- कोविड सेंटर्स संख्या
औषधांचा पुरवठा
कोरना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडिसिव्हिअर हे इंजेक्शन शासकीय रुग्णांलयात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. मधल्या काळामध्ये या औषधाचा तुडवडा जाणवला होता. वारंवार मागणी केल्यानंतर काही प्रमाणात या औषधाचा साठा जिल्ह्याला उपलब्ध झाला. सध्या औषधाचा साठा असून रुग्णांना अडचण येणार नसल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोविड सेंटर्स पुरेसे आहेत का?
जिल्ह्यात मे ते नोव्हेंबरपर्यंत रुग्णसंख्या वाढत होती. या काळात शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात आले. दरम्यान महापालिकेने काही खासगी डाॅक्टरांनाही परवानगी दिली होती. यासाठी मोठा प्रमाणात तयारी करण्यात आली. मात्र रुग्णसंख्या घटल्यामुळे रुग्णालय बंद करण्यात आले. सध्या ११ शासकीय तसेच खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांवर उपचार सुरु आहे.
बाॅक्स
पहिला पाॅझिटिव्ह सध्या काय करतोय
१. चंद्रपूर येथील तुकूम परिसरामध्ये सुरक्षारक्षक म्हणून कामाला असलेला एक जण पहिला कोरोना बाधित आढळला. त्याच्यावर प्रथम चंद्रपूर त्यानंतर नागपूर येथे उपचार करण्यात आला.
२. सध्या हा रुग्ण ठणठणीत असून आपले दैनदिन कामे करीत आहे. विशेष म्हणजे, आरोग्याकडे पहिल्यापेक्षा अधिकाधिक लक्ष देत आहे.
३.५० वर्षीय पहिल्या रुग्णांना कोरोनावर यशस्वी मात केली. त्याला काही आजारही होते. मात्र सध्या त्याची प्रकृती स्थिर असून तो नियमित कामावर जात आहे.