कोरोना बाधितांच्या बळींची संख्याही चढतीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:30 IST2021-04-02T04:30:00+5:302021-04-02T04:30:00+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २८ हजार ११० वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ३९० झाली आहे. ...

The number of Corona victims is also on the rise | कोरोना बाधितांच्या बळींची संख्याही चढतीवर

कोरोना बाधितांच्या बळींची संख्याही चढतीवर

जिल्ह्यात आतापर्यंत बाधितांची संख्या २८ हजार ११० वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ३९० झाली आहे. दोन हजार २९१ अ‍ॅक्टीव रूग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. दोन लाख ७६ हजार ११२ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ४४ हजार ३७५ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

आज मृत झालेल्यामध्ये मूल येथील ६७ वर्षीय पुरूष, चंद्रपूर रामनगरातील ३८ वर्षीय पुरूष व महाडोली वरोरा येथील ६५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४२९ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३८९, तेलंगणा, बुलडाणा, भंडारा व वर्धा येथील प्रत्येकी एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६ बाधितांचा समावेश आहे.

चंद्रपुरात १०२, वरोरा ७४ रूग्ण

आज बाधित आलेल्या ३५३ रूग्णांमध्ये चंद्रपूर मनपा क्षेत्रातील १०२, चंद्रपूर तालुका २१, बल्लारपूर ११, भद्रावती ३७, ब्रह्मपुरी तीन, नागभीड दोन, सिंदेवाही सात, मूल १३, सावली सहा, गोंडपिपरी एक, राजूरा १०, चिमूर ३६, वरोरा ७४, कोरपना २१, जिवती तीन व इतर ठिकाणच्या सहा रूग्णांचा समावेश आहे. आज १२० जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून सुटी देण्यात आली.

Web Title: The number of Corona victims is also on the rise