कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:35 IST2021-09-10T04:35:08+5:302021-09-10T04:35:08+5:30

जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १०३ झाली ...

The number of corona sufferers is zero | कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर

कोरोनाबाधितांची संख्या शून्यावर

जिल्ह्यात बाधितांची संख्या ८८ हजार ६७१ वर पोहोचली आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १०३ झाली आहे. सध्या २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ८१ हजार ७७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ९ हजार ५५७ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहे.

नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: The number of corona sufferers is zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.