अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या धडकी भरविणारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:24 IST2021-04-03T04:24:47+5:302021-04-03T04:24:47+5:30

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २८ हजार ४०७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ५६९ झाली ...

The number of active patients is staggering | अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या धडकी भरविणारी

अ‍ॅक्टिव रूग्णांची संख्या धडकी भरविणारी

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या २८ हजार ४०७ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २५ हजार ५६९ झाली आहे. सध्या २४०७ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ७८ हजार ३२३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी दोन लाख ४५ हजार ९६५ नमुने निगेटिव्ह आले आहेत. आज मृत झालेल्यामध्ये पळसगाव माजरी येथील ८५ वर्षीय पुरूष व ब्रह्मपुरी तालुक्यातील खारखाडा येथील ४५ वर्षीय पुरूषाचा समावेश आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ४३१ बाधितांचे मृत्यू झाले. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३९१, तेलंगणा, बुलडाणा, भंडारा येथील प्रत्येकी एक, गडचिरोली २०, यवतमाळ १६ आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे. कोरोनाचे रूग्ण सर्वच तालुक्यातुन आढळून येत आहेत. त्यामुळे मास्कचा वापर करावा, वारंवार हात धुवावे, सुरक्षित अंतर राखावे आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

चंद्रपूर, वरोरा, भद्रावतीत हॉटस्पॉटचे संकेत

आज बाधित आढळलेल्या २९७ रूग्णांमध्ये चंद्रपूर क्षेत्रातील ११३, चंद्रपूर तालुका २३, बल्लारपूर पाच, भद्रावती ४०, ब्रह्मपुरी ११, नागभीड दोन, सिंदेवाही पाच, मूल चार, सावली एक, पोंभूर्णा तीन, गोंडपिपरी दोन, राजूरा दोन, चिमूर २१, वरोरा ४७, कोरपना १२, जिवती एक व इतर ठिकाणच्या पाच रूग्णांचा समावेश आहे. चंद्रपूर, वरोरा व भद्रावतीत रूग्णसंख्या वाढत असल्याने हॉटस्पॉटचे संकेत आहेत.

Web Title: The number of active patients is staggering