ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९०५

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:26 IST2021-03-15T04:26:20+5:302021-03-15T04:26:20+5:30

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ७७८ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ...

Number of active patients 905 | ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९०५

ॲक्टिव्ह रुग्ण संख्या ९०५

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या २४ हजार ७७८ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या २३ हजार ४७१ झाली आहे. सध्या ९०५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत दोन लाख ३१ हजार ९२४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी दोन लाख पाच हजार २७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ४०२ बाधितांचे मृत्यू झाले असून, यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील ३६४, तेलंगणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली १८, यवतमाळ १६, भंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

आज बाधीत आलेल्या ११८ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील ४१, चंद्रपूर तालुका १६, बल्लारपूर दोन, भद्रावती १०, ब्रह्मपुरी १५, नागभिड चार, मूल तीन, पोंभुर्णा एक, गोंडपिपरी एक, राजुरा चार, वरोरा ११, कोरपना पाच व इतर ठिकाणच्या पाच रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनाचे रुग्ण कमी-अधिक प्रमाणात बहुतांश तालुक्यातून आढळून येत आहेत. नागरिकांनी कोरोना पूर्णपणे संपला, या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करून सुरक्षित राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Number of active patients 905