ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:30 IST2021-09-18T04:30:18+5:302021-09-18T04:30:18+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तसेच २ ...

Number of active patients 28 | ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २८

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात ४ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली, तसेच २ जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही.

बाधित आलेल्या २ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील १ आणि चंद्रपूर तालुक्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती या तालुक्यांत एकही रुग्ण आढळला नाही.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६९६ वर पोहोचली आहे, तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १२८ झाली आहे. सध्या २८ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ८८ हजार १० नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ५ लाख ९७ हजार ८२२ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

Web Title: Number of active patients 28