ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:31 IST2021-09-23T04:31:33+5:302021-09-23T04:31:33+5:30

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच चार जण ...

Number of active patients 26 | ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६

ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या २६

चंद्रपूर : मागील २४ तासांत जिल्ह्यात चार जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच चार जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी जिल्ह्यात एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या चार रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रातील एक, चंद्रपूर तालुका एक,भद्रावती येथे दोन रुग्णांचा समावेश आहे. तर बल्लारपूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मुल, सावली, पोंभुर्णा, गोंडपिपरी, राजुरा, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवतीमध्ये एकाही रुग्णांचा समावेश नाही. मृत झालेल्यांमध्ये भद्रावती तालुक्यातील एका पुरुषाचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ७१० वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १४३ झाली आहे. सध्या २६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ९२ हजार ७९८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी ६ लाख २ हजार ७१६ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १ हजार ५४१ बाधितांचे मृत्यू झाले आहे.

Web Title: Number of active patients 26