साहित्याअभावी न.प.च्या विंधन विहिरी नादुरूस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:57 IST2020-12-04T04:57:02+5:302020-12-04T04:57:02+5:30
घमश्याम नवघडे नागभीड : नगर परिषद क्षेत्रातील अनेक विंधन विहिरी बंद आहेत. दोन महिन्यापासून विंधन विहिरी ...

साहित्याअभावी न.प.च्या विंधन विहिरी नादुरूस्त
घमश्याम नवघडे
नागभीड : नगर परिषद क्षेत्रातील अनेक विंधन विहिरी बंद आहेत. दोन महिन्यापासून विंधन विहिरी दुरूस्ती करणाऱ्या साहित्याचा पुरवठाच झाला नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती आहे.
नगर परिषद अनेक गावांची मिळून बनली आहे. भिकेश्वर, चिखलपरसोडी, बोथली, तुकूम, बाम्हणी, डोंगरगाव, नवखळा, सुलेझरीसह अनेक गावे नागभीड नगर परिषदेत समाविष्ट करण्यात आली आहेत. ही गावे विंधन विहिरींवरच अवलंबून आहेत. या गावातील विंधन विहिरी दुरूस्त करण्याचे नगर परिषदेकडे युनिट आहे. नगर परिषदेला विंधन विहिरीच्या दुरूस्तीसाठी नागपूर येथील एक पुरवठादार साहित्याचा पुरवठा करतो. नगर परिषद प्रशासनाने या पुरवठादाराकडे साहित्याची मागणी अगोदरच नोंदविल्याचे समजते. मात्र साहित्याचा पुरवठा करण्यास पुरवठादाराकडून वेळकाढूपणा अवलंबला जात आहे.
नगर परिषदेत समाविष्ट असलेल्या अनेक गावातील विंधन विहिरी बंद तर आहेतच पण त्याचबरोबर शहरातीलही काही विंधन विहिरी बंद आहेत. नगर सेवकांनी याबाबत प्रशासनास विचारणा केली असता साहित्याचा पुरवठा झाल्याबरोबर या विंधन विहिरी दुरूस्त करण्यात येतील असे उत्तर देण्यात येते. नागभीड शहर आणि नगर परिषदेत समाविष्ट खेड्यांना नगर परिषद असली तरी संपूर्ण व्यवस्था कृषिप्रधान आहे. आजही या ठिकाणच्या नागरिकांना अगदी पहाटे उठल्यानंतर विंधन विहिरीचे पाणी घेऊन कामे आटोपून शेताच्या कामावर जावे लागते . आता विंधन विहिरी बंद असल्याने गावकऱ्यांची मोठी अडचण होत आहे. ही अडचण लक्षात घेऊन नगर परिषद प्रशासनाने पुरवठादाराकडून दुरूस्तीचे साहित्य केव्हा येणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.