शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

आता औषधांच्या चिठ्ठीवर शौचालयाची नोंद

By admin | Updated: February 8, 2015 23:33 IST

स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र,

माजरी: स्वच्छता मोहिमेची व्यापकता वाढविण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. आता आरोग्य यंत्रणावर विशेष भर देण्यात आला आहे. यात जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, कुटीर, वैद्यकीय केंद, संस्था, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, यासोबत नोंदणीकृत खासगी रुग्णालय, वैद्यकीय व्यावसायिक आणि निमशासकीय संस्था, कंपनीच्या रुग्णालयांना या मोहिमेत सहभागी करण्यात येणार आहे. त्यानुसार डॉक्टरांना आता औषधांचा चिठ्ठीवर रुग्णांच्या घरी किंवा कार्यालयात शौचालय आहे किंवा नाही, याबाबतची नोंद करावी लागणार आहे.प्रत्येक घरी शौचालय बांधण्यासाठी रुग्णांना प्रवृत्त करावे लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सन २१९ पर्यंत संपूर्ण देश निर्मल करण्याचे उद्दिष्ट ठरविले आहे. शौचालय नसल्यामुळे लोक उघड्यावर शौचास बसत आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता, पाणी व हवा दुषित होऊन अतिसार, कॉलरा, विषमज्वर, हगवण, कावीळ, कुपोषण, पोलीओ आणि रोटाव्हायरससारखे आजार होत आहेत. सरकारी, निमसरकारी, खासगी रुग्णालयांच्या मार्फत आरोग्य सुविधा पुरविल्या जातात. आता तर वैद्यकीय अधिकाऱ्यांवरही शौचालयाबाबतची जबाबदारी सोपविण्यात आली असून आता रुग्णांना तपासल्यानंतर दिल्या जाणाऱ्या औषधांच्या चिठ्ठीवर शौचालय आहे किंवा नाही याबाबतची नोंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.ज्यांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसल्यास अशा लोकांना समुपदेशन करुन शौचालय बांधण्यास प्रवृत्त करावे. रुग्णास शौचालयाचे होणारे फायदे व शौचालय नसल्याने होणारे नुकसान याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतात स्वच्छतेचा जागर होत आहे. खासगी असो की सरकारी कर्मचारी प्रत्येकाला स्वच्छतेचे महत्व पटले आहे. मात्र ग्रामीण, दुर्गम, आदिवासी, झोपडपट्टी यासह इतरही अनेक ठिकाणी स्वच्छतेच्या दृष्टीने येथील घटकांचा सक्रीय सहभाग असणे गरजेचे आहे. शासकीय आरोग्य विभाग आणि खासगी यंत्रणांच्या माध्यमातून प्रबोधनाद्वारे स्वच्छतेचा संदेश देण्याचा व जनजागृतीचा प्रयत्नही सुरू आहे. (वार्ताहर)