१०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:29+5:30

परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली.

Now the revised criteria for the examination center for the 5th | १०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

१०,१२ वीच्या परीक्षा केंद्रासाठी आता सुधारीत निकष

Next
ठळक मुद्देसुविधा नसलेल्याशाळा वगळणार : ३१ आॅगस्टपर्यंत प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दहावी आणि बारावीच्या परिक्षाकेंद्रासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले आहेत. त्यामुळे या निकषांना अनुसरून जिल्ह्यातील शाळांची माहिती ३१ आॅगस्टपर्यंत पाठविण्याच्या सूचना शिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
परीक्षा केंद्रासाठी यापूर्वीच्या निकषानुसार विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. पायाभूत सुविधा नसतानाही दहावी आणि बारावीचे परीक्षा केंद्र दिले जात होते. परिणामी जुन्या निकषांची दुरूस्ती करण्याची मागणी शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांनी केली. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेवून महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने सुधारित निकष जाहीर केले. या नवीन निकषानुसार शाळा व्यवस्थापकांना सुविधा निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागणार आहे. केंद्र व्यवस्थापनासाठी दोन वर्गखोल्या आणि २५ विद्यार्थ्यांमागे एक वर्गखोली या प्रमाणात वर्गखोल्या असाव्यात. इमारतीच्या खिडक्यांना बारीक जाळ्या असाव्यात, दुहेरी बेंच प्रत्येक विद्यार्थ्याला द्यावे लागणार आहे. प्रत्येक वर्गखोलीमध्ये वीज जोडणीसह किमान २ ट्युब एलईडी व पंखे असावेत. अद्यावत संगणक प्रिंटरसह इंटरनेट सुविधा तसेच सीसीटीव्ही कॅमेरे असणाऱ्या शाळा व महाविद्यालयांना नवीन निकषानुसार केंद्रासाठी प्रथम प्राधान्य दिल्या जाणार आहे.
परीक्षा कालावधीत केंद्राचे जनरेटर व्यवस्थित असावे, सर्व वर्गखोल्यांमध्ये दिवे, पंखे चालू राहतील इतक्या क्षमतेचे असावे. पर्यायी व्यवस्था म्हणून इनर्व्हटर, सौरउर्जा व अन्य सुविधा सज्ज ठेवण्याची जबाबदारी शाळेची आहे. अद्यावत अग्निशामक यंत्रणा व शाळेभोवती चारही बाजूने सुरक्षाभिंत असली पाहिजे. मुलामुलींसाठी स्वतंत्र व विद्यार्थी संख्येनुसार पुरेशी स्वच्छतागृहे असावीत.या स्वच्छतागृहांना कायमस्वरूपी पाणीपुरवठा असावा. केंद्र शाळेत प्रथमोपचार आरोग्य पेढी ठेवावी लागणार आहे. केंद्रापासून वैद्यकीय सुविधा पोस्ट आॅफीस, बसव्यवस्था, पोलीस स्टेशनजवळच्या अंतरावर असावेत. परीक्षा विषयक गोपनीय साहित्य ठेवण्यासाठी पुरेशी सोय व सुरक्षितता असावी. परिक्षा केंद्रावर दोन महाविद्यालये ही एकाच संस्थेची नसावीत. नव्याने सांकेतांक प्राप्त शाळा, महाविद्यालयांना शक्यतो दोन वर्षांपर्यंत परिक्षा केंद्र देण्यात येऊ नये. नवीन केंद्रांना तीन वर्षांकरिता केंद्र संचालक हा त्या शाळेव्यतिरिक्त अन्य घटकांतून विभागीय मंडळाकडून देण्यात येणार आहे. असे सुधारित निकष नवीन परीक्षा केंद्रासाठी लागू करण्यात आले आहेत.
विद्यार्थी संख्या वगळता ज्या अटींवर परीक्षा केंद्र मंजूर करण्यात आले. त्या अटींचे पालन केले नाही, तर केंद्र बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे आता परीक्षा केंद्राना प्रथम सुविधा उपलब्ध कराव्या लागणार आहे.

शाळांना द्याव्या लागणार सुविधा
शाळा, महाविद्यालयांना परीक्षा केंद्र अबाधित ठेवायचे असेल तर नवीन निकषानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे, या निकषानुसार ग्रामीण आणि दुर्गम भागातील केंद्रांना मोठी कसरत करावी लागणार आहे.

बोगस प्रकार थांबतील
दहावी आणि बारावीमध्ये पास होण्यासाठी अनेक विद्यार्थी गैरमार्गाचा वापर करतात. हा प्रकार टाळण्यासाठी परीक्षा मंडळाने नवीन निकष जाहीर केले आहे. त्यामुळे भविष्यात परीक्षेदरम्यान करण्यात येणारे गैरप्रकार थांबतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Now the revised criteria for the examination center for the 5th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.