शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आता रेल्वे तिकिटाचे आरक्षण करता येणार ६० दिवसांआधी, तिकिटांचा काळाबाजार वाढण्याची भीती !

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 14:04 IST

Chandrapur : प्रवशांनी व्यक्त केली नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क बल्लारपूर : ऐन दिवाळी आणि पर्यटन हंगामाच्या तोंडावर रेल्वे मंत्रालयाने आरक्षणासाठीचा कालावधी १२० दिवसांवरून ६० दिवसांवर आणून प्रवाशांना धक्का दिला आहे. रेल्वेने तिकीट बुकिंगच्या नियमात बदल केले आहेत. या नियमानुसार आता १२० दिवस आधी नव्हे तर केवळ ६० दिवस आधी रेल्वेचे तिकीट बुकिंग करता येणार आहे. १ नोव्हेंबरपासून याची अंमलबजावणी होणार आहे. या निर्णयाविषयी प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

प्रवाशांच्या म्हणण्यानुसार रेल्वेचे आरक्षित तिकीट आताच मिळत नाही तर ६० दिवसांच्या निर्णयामुळे आणखी "वेटिंग" वाढेल. यातून आणखी रेल्वे तिकिटांचा काळाबाजार फोफावणार आहे. 

रेल्वेचे तिकीट १२० दिवस म्हणजे चार महिने आधी बुक करण्याच्या सुविधेमुळे प्रवाशांना प्रवासाचे नियोजन खूप अगोदर करणे शक्य होते. त्यामुळे रेल्वेचे तिकीट आरक्षित करणे सोयीचे होते; परंतु नव्या निर्णयानुसार ६० दिवसांची कालमर्यादा ठरविण्यात आली आहे. यामुळे तिकीट बुकिंगसाठी झुंबड उडेल. कारण रेल्वे प्रवासाचे नियोजन हे ६० दिवसातच करावे लागेल. ऐन दिवाळीच्या हंगामात घेतलेला निर्णय हा प्रवाशांना फटका देणारा असून रेल्वे प्रशासनाने यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.

१२० दिवसच कायम राहावा "रेल्वेचे आरक्षण करण्यासाठी १२० ऐवजी ६० दिवसांपर्यंत कालावधी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे रेल्वे तिकिटांचा अधिक काळाबाजार होणार आहे. सर्वसामान्य प्रवाशांच्या सुविधेसाठी हा निर्णय मागे घेतला पाहिजे. रेल्वेचे आरक्षण करण्याचा कालावधी १२० दिवसच कायम राहावा."- जयकरणसिंग बजगोती, माजी डीआर यूसीसी सदस्य, बल्लारपूर.

"हा निर्णय चुकीचाच ६० दिवसानंतर कुठे जायचे असेल तर नियोजनच करता येणार नाही. रेल्वेचे आरक्षण, हॉटेल आदींचे बुकिंग करता येणार नाही. त्यामुळे प्रवास ढकलावा लागेल. त्यामुळे रेल्वेचे आरक्षण पूर्वीचेच ठेवावे." - अतुल भांबोरे, जनाधार अधिवक्ता संघ

"तारखेनुसार नियोजन ज्या तारखेनुसार जायचे असेल, त्यानुसार तिकिटाचे नियोजन करावे लागेल. याचा त्रास पर्यटनाला जाणाऱ्यांना होणार, यामुळे वेटिंग वाढेल. त्यामुळे आरक्षणाचा सध्या असलेला कालावधी कायम ठेवावा."- विवेक खुटेमाटे, सामाजिक कार्यकर्ता, बल्लारपूर.

टॅग्स :railwayरेल्वेchandrapur-acचंद्रपूर