...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 05:00 AM2021-10-05T05:00:00+5:302021-10-05T05:00:42+5:30

कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत.

... Now Guruji will be the doctor in every school, we have to check how much Ramya's fever is! | ...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

...आता प्रत्येक शाळेत गुरुजी होणार डाॅक्टर, राम्याचा ताप किती, हेही तपासावे लागणार!

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : ग्रामीण भागातील पाचवी ते बारावी तसेच शहरातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले आहे. शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक शाळेमध्ये  हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.  त्यामुळे प्रत्येक शाळेतील गुरुजी डाॅक्टर होणार असून विद्यार्थ्यांचे आरोग्य तपासणी करावी लागणार आहे. 
कोरोना संकटामुळे मागील दीड वर्षापासून शाळा बंद  होत्या. आता कोरोना प्रभाव कमी झाला नसता तरी कोरोना नियंत्रणात असल्यामुळे शासनाने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता पाचवी ते बारावी तसेच शहरी भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शाळा सुरू झाल्या आहे. त्यामुळे शासनाने शाळांना काही सूचना केल्या आहेत. प्रत्येक शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करण्यासोबतच शाळेत येताना घ्यावयाची काळजी, आदी सूचना शासनाने केल्या आहेत. 

हेल्थ क्लिनिकमध्ये काय काय राहणार
- शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू करून ऑक्सिमिटर, थर्मामीटर, सॅनिटायझर, मास्क आदी साहित्य शाळांनी उपलब्ध करून द्यावे.
- विद्यार्थ्यांचे नियमित टेम्परेचर, सर्व शाळा आरोग्य केंद्राशी सलग्न कराव्यात.
   इच्छुक डाॅक्टर, पालकांची मदत घ्यावी.
- आरोग्य केंद्रातील डाॅक्टर व परिचारिकांची मदत घ्यावी.
- येता-जाताना मुलांचा मास्क पडला तर मुलांना मास्क उपलब्ध करून देण्यासाठी शाळांनी मास्कचा साठा ठेवावा.

शिक्षकांची जबाबदारी वाढणार
nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांमध्ये हेल्थ क्लिनिक सुरू करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांची जबाबदारी वाढणार आहे.
nशाळेत आलेल्या प्रत्येक मुलांचे तापमान, ऑक्सिजन मात्रा तपासून नोंद करावी लागणार आहे.
nएखाद्या विद्यार्थ्याला सर्दी, ताप असल्याचे लक्षात आल्यास तातडीने त्याच्या पालकांना कळवून वैद्यकीय उपचारासाठी घरी पाठवावे लागणार आहे.
nकोरोना होऊन गेलेल्या मुलांशी शिक्षकांना सर्वसामान्य मुलांप्रमाणे वागायचे आहे.

शिक्षक काय म्हणतात....

शाळा सुरू झाल्या आहे. याचे प्रत्येकांना समाधान आहे. शाळेत हेल्थ क्लिनिक सुरू आहे. विद्यार्थ्यांची तपासणी केली जात आहे. प्रत्येकांचे आरोग्य सुदृढ राहणे गरजेचे आहे. मात्र, सुविधा पुरविण्यासाठी शासनानेही शाळांना अनुदान देणे महत्त्वाचे आहे.
-प्राचार्य नरेंद्र बोबडे, 
अध्यक्ष, मुख्याध्यापक असोसिएशन, चंद्रपूर
 

विद्यार्थ्यांच्या आरोग्य जपण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळांमध्ये तपासणी केली जात आहे. शासकीय नियमावलीचे पालन करून वर्ग भरविले जात आहे. पालकांचेही सहकार्य लाभत आहे.
-राजू साखरकर, 
मुख्याध्यापक, चंद्रपूर

 

Web Title: ... Now Guruji will be the doctor in every school, we have to check how much Ramya's fever is!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.