नवीन शिलेदारांपुढे आता विकासाचे आव्हान

By Admin | Updated: December 23, 2016 00:50 IST2016-12-23T00:50:21+5:302016-12-23T00:50:21+5:30

नव्याने झालेल्या सिंदेवाही नगरपंचायतची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. नागरिकांनी भाजपाकडे सत्ता दिली.

Now the challenge of development ahead of new rockers is the development challenge | नवीन शिलेदारांपुढे आता विकासाचे आव्हान

नवीन शिलेदारांपुढे आता विकासाचे आव्हान

२७ ला निवडणूक : सत्ता स्थापनेची उत्सूकता
सिंदेवाही : नव्याने झालेल्या सिंदेवाही नगरपंचायतची गेल्या महिन्यात निवडणूक झाली. नागरिकांनी भाजपाकडे सत्ता दिली. भाजपा ११ व काँग्रेस ६ असे बलाबल आहे. त्यामुळे काँग्रेस विरोधी बाकावर बसणार, हे नक्की. परंतु राजकारणात काहीही होऊ शकते, यासाठी भाजपाचे काही नगरसेवक तीर्थस्थळी गेल्याचे समजते.
नगराध्यक्ष निवडीची २७ डिसेंबर आहे. ज्या विकासाच्या नियोजनावर भाजपाने मते मागली आहे. ते पूर्ण करणे ही सर्वात मोठी जबाबदारी भाजपावर आहे. सर्वाधिक चर्चेत राहिलेला व जिव्हाळ्याचा विषय सिंदेवाहीची पाणीपुरवठा योजना होय. नवीन नगरसेवकांपुढे शहरातील विविध समस्या आहेत. शहरातील अस्वच्छता, घनकचरा, कर असे अनेक प्रश्न त्यांच्यापुढे उभे राहणार आहे. भाजपाचे खासदार अशोक नेते, माजी आमदार अतुल देशकर, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपंचायत विकासाची गाडी धावेल, अशी आशा नागरिकांना आहे. शासनाच्या निधी जास्त मिळावे, यासाठी भाजपाने प्रयत्न करावे. विरोधी बाकावर काँग्रेसच्या नगरसेवकांचे बसणार असल्याने त्यांची करडी नजर राहणार.
नगराध्यक्षपदासाठी मोहिनी गेडाम व जीवने या दोघापैकी एक नाव निश्चित होईल. सभापती व स्वीकृत सदस्यासाठी भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचे सूत्राकडून कळते. काँग्रेसने स्वीकृतसाठी आ. विजय वडेट्टीवार यांच्या आदेशाने नाव जाहीर होणार असल्याचे समजते. आ. वडेट्टीवार यांच्या सहकार्यातूनसुद्धा शहरातील समस्या त्वरित सुटतील. नगरपंचायततर्फे राजकारण करणार नाही, असे सांगितले आहे. त्यामुळेच आता नव्या शिलेदारांनाही आमदार-खासदार यांच्याशी समन्वय ठेऊन विकास करावा लागेल. मागील कार्यकाळात काय झाले, याचा कोळसा उगाळण्यापेक्षा आता नव्याने विकासाचे नियोजन करावे लागणार आहे. तरच मतदारांना आशा दाखविता येईल. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Now the challenge of development ahead of new rockers is the development challenge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.