रुग्णवाहिकांच्या मनमानीवर आता प्रशासनाची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:00 IST2020-07-07T05:00:00+5:302020-07-07T05:00:58+5:30

टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रुपये तर १८ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे.

Now the administration is looking at the arbitrariness of ambulances | रुग्णवाहिकांच्या मनमानीवर आता प्रशासनाची नजर

रुग्णवाहिकांच्या मनमानीवर आता प्रशासनाची नजर

ठळक मुद्देदर निश्चित : आरटीओमध्ये करता येणार तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीत रुग्णवाहिकांचे भाडे निश्चित करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारल्यास किंवा इतर तक्रारीसाठी नागरिकांना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयात तक्रार दाखल करता येणार आहे. संचालकांच्या मनमानीवर आता निर्बंध आले आहे.

असे असणार दर
२५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता तसेच प्रति किलोमीटर याप्रमाणे भाडे निश्चित केलेले आहे. मारुती व्हॅन या वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ६०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित करण्यात आले आहे. टाटा सुमो व मेटॅडोर सदृश्य कंपनीने बांधणी केलेली वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ७०० तर १२ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. टाटा ४०७, स्वराज आदींच्या बांधणी केलेली वाहने, विंगर, टेम्पो ट्रॅव्हलर वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता ८०० रुपये तर १८ रुपये प्रति किलो मीटर भाडे दर निश्चित केले आहे. आयसीयू अथवा वातानुकूलित वाहनाचा २५ किलो मीटर अथवा दोन तासाकरिता १ हजार तर २२ रुपये प्रति किलो मीटर भाडे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे रुग्णवाहिका संचालकांच्या मनमानीला चाप बसणार आहे.

Web Title: Now the administration is looking at the arbitrariness of ambulances