शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

पाणी नाही तर करही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 00:29 IST

कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे.

ठळक मुद्दे३० एप्रिलला तीव्र आंदोलन : पाण्यामुळे चंद्रपूरकरांचे हाल

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कधी नव्हे एवढे भीषण पाणी टंचाईचे सावट चंद्रपूरकरांवर कोसळले आहे. इरई धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असूनही पाणी कपात चंद्रपूरकरांवर लादल्या जात आहे. यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होऊन चंद्रपूरकरांचे हाल होत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे नागरिकांवर ही वेळ आली आहे. मात्र आता नागरिकांचा संयम सुटला आहे. पाणी नाही तर नागरिक करही भरणार नाही, असा इशारा यंग चांदा ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किशोर जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेतून दिला.चंद्रपूर हे शांतीप्रिय शहर आहे. याचाच फायदा महानगरपालिका घेत असून आर्थिक जुळवा - जुळव करण्यासाठी उज्ज्वल कन्स्ट्रक्शनला हाताशी धरुन शहरात पाणी टंचाई निर्माण केली जात आहे. शहरातील अनेक भागात १० दिवसांपासून पाणी पूरवठा ठप्प आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात नागरिकांना उन्हाचे चटके सोसत पाण्यासाठी भटकावे लागत आहे. शहरातील बाबूपेठ, भिवापूर वार्ड, विठ्ठल मंदिर वार्ड, घुटकाळा वार्ड, इंदिरा नगर, बालाजी वार्ड, नेहरू नगर, तुकूम, रामनगर, दादमहल वार्ड, भानापेठ वार्ड, म्हाडा कॉलनी या भागातील परिस्थिती अतिशय बिकट आहे. शहराला पाणी पूरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या उज्ज्वल कंन्ट्रक्शनलाही महानगर पालिकेच्या काही मोठया पदाधिकाऱ्यांचा आशीर्वाद असल्याने त्याचा मुजोरीपणा कायम आहे, असे जोरगेवार यांनी यावेळी सांगितले.एकीकडे नागरिक चरवीभर पाण्यासाठी इतरत्र भटकंती करीत आहेत तर दुसरीकडे महापालिका सुशोभिकरणाच्या नावावर हजारो लिटर पाण्याचा अपव्यय करीत आहे. अनेक ठिकाणी पाईप लाईन फुटली असल्याने पाणी रस्त्यावर वाहत असल्याचेही चित्र आहे. त्यामुळे ही पाणी कपात पाणी टंचाईमुळे जाणीवपूर्वक केली जात आहे.येत्या ३० एप्रिलला पाणी द्या अन्यथा खुर्ची खाली करा, अशी मागणी करीत तिव्र आंदोलन करण्यात येणार असल्याची माहितीही जोरगेवार यांनी दिली. पाणी समस्या असलेल्या प्रत्येक प्रभागात यंग चांदा ब्रिगेडच्या माध्यमातून त्यांच्या हक्कासाठी जनजागृती करण्यात येणार आहे. नागरिकांनीही त्यांच्या भागात पाणी पूरवठा सुरळीत होत नसल्यास तशी लेखी तक्रार यंग चांदा ब्रिगेडकडे द्यावी, असेही जोरगेवार यांनी सांगितले.इरई धरणाची केली पाहणीरविवारी किशोर जोरगेवार यांनी शहराला पाणी पूरवठा करणाºया इरई धरणाची पहाणी केली असता धरणात मुबलक पाणीसाठा असल्याचे दिसून आले. धरणात पाणीसाठा असतानाही नागरिकांना पाण्यासाठी भटकावे लागणे हे नियोजनशून्य कारभारचे लक्षण असून यात मोठे आर्थिक समिकरण जुळविले जात आहे, असा आरोपही किशोर जोरगेवार यांनी केला आहे. पाणी कपातीबाबत मनपा आयुक्त बोलायला तयार नाही. मात्र आमचा संयम आता संपला आहे. आजवर आम्ही पाणी द्या, अशी वारंवार विनंती केली होती. परंतू यापुढे आम्ही विनंती करणार नाही तर आमच्या हक्काचे पाणी हिसकावून मिळवू. या लढाईत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास याला मनपा प्रशासन जवाबदार असेल, असेही जोरगेवार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

टॅग्स :Damधरणwater shortageपाणीटंचाई