न. प. कर्मचाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:23 IST2021-01-09T04:23:04+5:302021-01-09T04:23:04+5:30
सिंदेवाही : आचार्य ...

न. प. कर्मचाऱ्यांचा सत्कार
सिंदेवाही : आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त तालुका मराठी पत्रकार संघ, सिंदेवाहीच्या वतीने कोविड १९ या जागतिक महामारीत कोरोना योद्धे म्हणून उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नगर पंचायत सिंदेवाहीच्या मुख्याधिकारी सुप्रिया राठोड आणि नगर पंचायतीच्या सर्व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात वेळेची तमा न बाळगता सुप्रिया राठोड व त्यांच्या टीमने अहोरात्र परिश्रम घेतले. यावेळी सुप्रिया राठोड यांनी मनोगत व्यक्त केले. संचालन तालुका मराठी पत्रकार संघाचे सचिव पिंटू बेलोरकर यांनी केले.
याप्रसंगी तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश बोरकुंडवार, उपाध्यक्ष शरद नैताम ,उपाध्यक्ष सुधाकर भाऊ गजभिये, सचिव पिंटू बेलोरकर, सहसचिव अनिल एलकेवार, सदस्य बालू बतकमवार, अनिल कंटीवार आणि नगर पंचायतचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.