महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी नो व्हेईकल डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:34 IST2021-02-05T07:34:58+5:302021-02-05T07:34:58+5:30
भद्रावती : रस्त्यावर वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे उत्पन्न होत असलेल्या अनेक श्वसनासंबंधीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या ...

महिन्याच्या प्रत्येक शुक्रवारी नो व्हेईकल डे
भद्रावती : रस्त्यावर वाढत असलेल्या वाहनांच्या संख्येमुळे उत्पन्न होत असलेल्या अनेक श्वसनासंबंधीच्या आजारांना आळा घालण्यासाठी व पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टिकोनातून माझी वसुंधरा अभियानाची सुरुवात करण्यात आली.
या अभियानाच्या अनुषंगाने नगर परिषद भद्रावतीद्वारे २ फेब्रुवारीला सकाळी आठ वाजता नगरपरिषद कार्यालय ते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार ते परत गणेश मंदिर गवराळा दरम्यान सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शहरातील सर्व शासकीय, निमशासकीय, खासगी, व्यवसायिक कर्मचारी, रहिवासी व शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन नगर परिषद, मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी केले आहे. तसेच स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ सर्वेक्षण, माझी वसुंधरा अभियानांतर्गत आठवड्याच्या प्रत्येक शुक्रवारी नो व्हेईकल डेचे पालन करण्याचे आवाहनही नगरपरिषदेद्वारे करण्यात आले आहे.