कितीही मोठे झाले तरी समाजऋण विसरू नका
By Admin | Updated: July 5, 2017 01:09 IST2017-07-05T01:09:44+5:302017-07-05T01:09:44+5:30
कोणतेही क्षेत्र हे कमी दर्जाचे नसते, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या क्षेत्राची निवड करून स्वक्तृाने पुढे जा, ...

कितीही मोठे झाले तरी समाजऋण विसरू नका
विजय देवतळे : खैरे कुणबी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोणतेही क्षेत्र हे कमी दर्जाचे नसते, ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे. त्या क्षेत्राची निवड करून स्वक्तृाने पुढे जा, समाजाचा नावलौकिक वाढवा, भविष्यात कितीही मोठे झाले तरीसमाजाचे विस्मरण होऊ न देता समाज ऋण फे डण्यासाठी सदैव तत्पर राहा असे आवाहन खैरे कुणबी समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. विजय देवतळे यांनी केले.
जिल्हा खैरे कुणबी समाज संघटनेतर्फे स्थानिक मातोश्री सभागृहात आयोजित खैरे कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थी व लोक प्रतिनिधींच्या सत्कार सोहळ्यात अध्यक्षपदावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पोंभूर्णा पं.स.चे उपसभापती विनोद देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. तर प्रमुख पाहुणे म्हणून मूलच्या नगराध्यक्षा प्रा. रत्नामाला भोयर, शीला मशाखेत्री, समाजाचे ज्येष्ठ नेते खुशाल बोंडे, जि. प. सदस्य डॉ. आसावरी देवतळे, वैशाली शेरकी, योगिता डबले, मनिषा चिमूरकर, समाज कल्याण अधिकारी विजय वाकूलकर, प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर, वरोरा न.पं.चे उपाध्यक्ष अनिल झोटिंग पं.स.सदस्या मनिषा जवादे, डॉ.बी.के़ लोणारे, दिनकर ढोंबरे, प्रा. महेश पाणसे, प्रा. अनिल चौखुंडे, डॉ. अश्विनी बोकडे, प्राचार्य मांडवकर, बंडू भोज, समीर भोयर, सुधाकर पांडव, सुधाकर चरडूके आदी उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात देशमुख यांनी गुणवंत विद्यार्थी हे समाजाचे भूषण असल्याचे सांगितले. तर रत्नमाला भोयर, आरेकर, डॉ. आसावरी देवतळे, योगिता डबले यांनही सत्काराला उत्तर देताना समाजाप्रति कृतज्ञता व्यक्त करीत समाज बांधवांना मार्गदर्शन केले. यावेळी इयत्ता १० वीच्या १०५ विद्यार्थ्यांचा तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी, आचार्य पदवी प्राप्त मान्यवर आणि मिमिक्री पेंन्टींग, नृत्य आदी कला जोपासणाऱ्या कल्पक चिंचोलकर या विद्यार्थ्यांच्या समाजाचे जिल्हाध्यक्ष डॉ. देवतळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक खुशाल बोंडे, संचालन समाजाचे सचिव जे.डी.पोटे यांनी तर आभार तोमाजी झाडे यांनी मानले. यशस्वीतेकरिता विठ्ठल धोटे, अरून भोयर, अभय किनेकर, विकास पाचभाई, जगदीश गुरकडे, विलास खडसे, विजय रोहनकर, बोरकर, धनंजय पोटे आदींनी प्रयत्न केले.