शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
3
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
4
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
5
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
7
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
8
काय सांगता? आमदारांना मिळतो खासदारांपेक्षा अधिक पगार व भत्ते 
9
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
10
महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा; काँग्रेसकडून निवडणूक आयोगाकडे आचारसंहिता भंगाची तक्रार
11
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
12
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
13
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
14
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
15
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
16
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
17
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
18
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
19
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
20
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया

एमआयडीसीच्या भूखंडावर ना उद्योग आले ना रोजगार मिळाला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 5:00 AM

वेकोली, वीजनिर्मिती, कागद उत्पादन, सिमेंट कारखाने आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमुळे तीन-चार दशकांपासूनच चंद्रपूर जिल्ह्याची उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण झाली. या दीर्घ कालखंडाचा विचार केल्यास प्रस्थापित व नवीन उद्योगांची भरभराट होऊन रोजगाराची व्याप्ती वाढली असती. राज्य शासनाने एमआयडीसी निर्माण केल्याने उद्योगांचा विस्तार तालुकास्तरवरही पोहोचविण्याची संधी निर्माण झाली.

ठळक मुद्देउद्योग वसाहत नावालाच : प्रकल्पाला शेतजमीन देणाऱ्या शेतकऱ्यांचाही हिरमोड

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) शेतकऱ्यांकडून शेतजमिनी अधिग्रहित करताना स्थानिकांना रोजगार आणि उद्योगांना चालना मिळावी, असा धोरणात्मक हेतू होता. त्यामुळे शेतकºयांनी शासनाला वडिलोपार्जित जमिनी दिल्या. एमआयडीसीने या जागेचे भूखंड विविध कर व सवलतींसह उद्योजकांकडे हस्तांतरीत केल्या. मात्र पाच वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही बहुतांश एमआयडीसीमध्ये ना उद्योग आले ना नव्याने रोजगार निर्माण झाला, अशी जिल्ह्याची भीषण सद्यस्थिती आहे.वेकोली, वीजनिर्मिती, कागद उत्पादन, सिमेंट कारखाने आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांमुळे तीन-चार दशकांपासूनच चंद्रपूर जिल्ह्याची उद्योगनगरी म्हणून ओळख निर्माण झाली. या दीर्घ कालखंडाचा विचार केल्यास प्रस्थापित व नवीन उद्योगांची भरभराट होऊन रोजगाराची व्याप्ती वाढली असती. राज्य शासनाने एमआयडीसी निर्माण केल्याने उद्योगांचा विस्तार तालुकास्तरवरही पोहोचविण्याची संधी निर्माण झाली. शेतकºयांनीही भविष्याचा विचार करून आपल्या कसदार जमिनी एमआयडीसीला दिल्या. आजमितीस शेतकऱ्यांनी सुमारे ६०० ते ७०० हेक्टर जमीन एमआयडीसीच्या वसाहतींना दिल्या. संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एमआयडीसीने या जमिनी उद्योजकांना दिल्या. पण बहुतांश ठिकाणी उद्योगच सुरू झाले नाहीत. त्यामुळे शेतजमीन देणाºया शेतकरी व बेरोजगारांचाही हिरमोड झाला आहे. 

उद्योग सुरू नसूनही भूखंडावर कब्जा-अटी व शर्तींचे पालन करून एमआयडीसी क्षेत्रात घेतलेल्या भूखंडावर पाच वर्षांत उद्योग  सुरू करणे अनिवार्य आहे. अन्यथा हा भूखंड शासनाला परत करावा लागतो. मात्र चंद्रपूर,      पडोली-घुग्घुस, नागभीड, सिंदेवाही, चिमूर, मूल, भद्रावती, राजुरा व वरोरा येथील अनेक भूखंड  उद्योगविनाच ताब्यात ठेवण्यात आल्या आहेत.

असुविधांच्या गर्तेत अडकली एमआयडीसीnएमआयडीसीत ड्रेनेज समस्या आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वीज उत्पादन होऊनही जादा दर द्यावा लागतो. उद्योगवाढीसाठी पायाभूत सेवा नाहीत. त्यामुळे उद्योजक व कामगारांची गैरसोय होते. औद्योगिक समस्या सोडविण्यासाठी राज्य सरकारने जिल्हा उद्योगमित्र समिती स्थापन केली. पण नियमित बैठका होत नाहीत. कचरा विल्हेवाटीचा प्रश्न आहे. कच्चा मालाचा तुटवडा आणि बँकांकडून कर्ज मिळण्यात अडचणी आहेत.

रोजगार मिळेल हे स्वप्नच!

रोजगार मिळेल यासाठी शेतकºयांनी प्रकल्पाला जमिनी दिल्या. मात्र अनेकांनी उद्योग सुरू केले नाही. काहींनी केवळ जमिनी ताब्यात ठेवल्या आहेत. मोठ्या आशेने जमिनी देऊन शेतकºयांच्या मुलांना बेरोजगारीचे दिवस पाहावे लागत आहेत. -प्रमोद डोंगरे, प्रकल्पग्रस्त, पडोली चंद्रपूर

सरकारने जमिनी वापस घेऊन जे उद्योजक व्यवसाय सुरू शकतात. त्यांना दिल्या पाहिजे. शेतीपासून पुरेसा रोजगार मिळत नाही. आयटीआय करूनही एमआयडीसीत काम मिळाले नाही. कोरोनामुळे पुन्हा अडचणी वाढल्या आहेत.-प्रदीप चूधरी, दाताळा, चंद्रपूर

प्रकल्पासाठी जमीन दिली, मात्र कुटुंबातील पात्रता धारकाला अद्याप रोजगार मिळाला नाही. शासनाने जमीन घेताना आश्वासन दिले होते. परंतु, आजही हा अन्याय दूर झाला नाही. कंपनीने नाेकरीही दिली नाही.-वाघू उईके, उसगाव

 

टॅग्स :MIDCएमआयडीसीjobनोकरी