चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 13:13 IST2018-03-08T13:13:41+5:302018-03-08T13:13:48+5:30

घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, हा समज त्यांनी खोटा ठरविला आहे.

No gateman at railway gate in Chandrapur, there is Gatewoman! | चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

चंद्रपुरात रेल्वे गेटमॅन नव्हे, गेटवुमन !

ठळक मुद्देरेल्वे विभागात पार्इंटमॅन हे पद आॅपरेटींग संर्वगात येते. रेल्वे फाटकाचे काम गेटमॅन पाहतो. परंतु, माधुरी रामटेके यांच्यासाठी रेल्वे प्रशासनाने नागपूर विभागात प्रथमच गेटवूमनची निर्मिती केली आहे.

नितीन मुसळे।
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : घरची परिस्थिती जेमतेम. वडिलांचा टेलरींगचा व्यवसाय. यातच आई-वडील व दोन बहिणींचेही संगोपन करावे लागत होते. मात्र, या सर्व समस्यांवर मात करून माधुरी विश्वनाथ रामटेके यांनी रेल्वेत नोकरी मिळविली. धोकादायक रेल्वे गेटची सुरक्षा करणे हे पुरुषांचे काम आहे, हा समज त्यांनी खोटा ठरविला आहे.
माधुरी रामटेके नागपुरातील मूळ रहिवाशी आहेत. १० वी पर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालयातून पूर्ण केले. खासगी शिकवणी घेवून त्या १२ वी झाल्या. पुढे अभियांत्रिकीची पदविका मिळविल्यानंतर नोकरीचा शोध सुरू केला. सोबत एम.ए. आणि बीएड् शिक्षण घेतले. दरम्यान, २०१२ ला रेल्वेच्या परिक्षेत यश मिळाले. तेलंगणा राज्यामधील कोचीगुडा येथे मुलाखत दिली. त्यावेळी उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेशसह महाराराष्ट्रातील हजारो युवक सहभागी झाले होते. परंतु त्यात युवतींची संख्या केवळ १० होती. त्यातही महाराराष्ट्रातून एकमेव. रेल्वेची परिक्षा पास करुन वैद्यकीय चाचणीही झाली. त्यानंतर प्रशिक्षण पूर्ण केले. रेल्वेमध्ये हार्डवर्क असते. मात्र, कठोर प्रयत्नातून हा पल्ला गाठला. आॅक्टोबर २०१३ ला पाईन्टमॅन म्हणून नक्षलग्रस्त भागातील आंध्र- महाराराष्ट्रा सीमेवरील माकोडी रेल्वे स्थानकावर नियुक्ती झाली. तिथे दुकान आणि फोन, मोबाईलही नाही, अशा परिस्थितीत सहा महिणे पूर्ण केल्यानंतर माणिकगड (चुनाळा) येथे स्थलांतरण झाले.

Web Title: No gateman at railway gate in Chandrapur, there is Gatewoman!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.