बेबाळ सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:18 IST2021-07-23T04:18:23+5:302021-07-23T04:18:23+5:30
गुरुवारी बेंबाळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या मतदानात विद्यमान सरपंच करुणा उराडे यांच्या बाजूने ...

बेबाळ सरपंचावरील अविश्वास प्रस्ताव बारगळला
गुरुवारी बेंबाळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. या मतदानात विद्यमान सरपंच करुणा उराडे यांच्या बाजूने कौल दिल्याने, त्या पदावर कायम राहिल्या आहेत. सरपंचावर आणलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला असून, सरपंचाच्या बाजूने ६५६ तर याविरुद्ध ४०५ मते पडली. २५१ मतांनी सरपंचांनी विजय प्राप्त केला.
मूलचे तहसीलदार डॉ. रवींद्र होळी यांच्या उपस्थितीत अविश्वास प्रस्ताव १० विरुद्ध ० मतांनी पारित करण्यात आला होता. त्यावेळी सरपंच करुणा उराडे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले. शासनाच्या १ सप्टेंबर २०१६ च्या परिपत्रकानुसार आणलेला अविश्वास ठराव मतदारांच्याच संमतीने पारित होतो. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार करुणा उराडे या सरपंचपदी कायम झाल्या होत्या. त्या अनुषंगाने उराडे यांच्याविरुद्ध अविश्वास ठरावासाठी बेंबाळ येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत मतदान घेण्यात आले. १११९ मतदारांनी मतदानात भाग घेतला. यात अविश्वासाच्या विरुद्ध ६५६ तर अविश्वासाच्या बाजूने ४०५ मतदारांनी मतदान केले.