स्वाध्याय उपक्रमात चंद्रपूर राज्यात नवव्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:16 IST2021-03-29T04:16:30+5:302021-03-29T04:16:30+5:30
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुडन्स व्हाॅटॲपर बेस्ट ...

स्वाध्याय उपक्रमात चंद्रपूर राज्यात नवव्या स्थानी
चंद्रपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणेने पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वाध्याय स्टुडन्स व्हाॅटॲपर बेस्ट डिजिटल होम असाईमेंट योजना सुरु केली आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमासोबत जोडून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील २ लाख २१ हजार ८९१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून १ लाख १२ हजार ३१३ विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडविले आहे. विशेष म्हणजे, या योजनेमध्ये डिसेंबर महिन्यामध्ये चंद्रपूर जिल्हा राज्यात अव्वलस्थानी होता. सध्या ९ व्या क्रमांकावर असून शिक्षण विभाग अधिकाधिक विद्यार्थ्यांनी स्वाध्याय सोडवावे, यासाठी प्रयत्न करीत आहेत.
पहिली ते दहावीपर्यंत मराठी तसेच सेमी इंग्रजीच्या वर्गासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणेने प्रश्नमंजूषा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा व्हॅाटॲपद्वारे प्रश्न पाठवून ते सोडून घेतले जातात. विशेष म्हणजे, योग्य की अयोग्य यासंदर्भातही वेळीच उत्तर मिळते. अभ्यासक्रम सोप्या पद्धतीचा असल्यामुळे विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत आहे. यासाठी मुख्यकार्यपालन अधिकारी राहुल कर्डिले यांनी विशेष प्रयत्न केले असून डायट तसेच जिल्हा परिषद शिक्षण विभाग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे कोरोनाच्या काळातही विद्यार्थी काही प्रमाणात का, होईना अभ्यासक्रमासोबत जुडून आहे.
कोट
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांची अभ्यासाची लिंक तुटू नये यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांचे विशेष मार्गदर्शन मिळत असून, शिक्षणाधिकाऱ्यांसह विषय तज्ज्ञ, साधनव्यक्ती, समावेशित शिक्षकतज्ज्ञ तसेच शिक्षकसुद्धा यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यामुळेच अधिकाधिक विद्यार्थी या योजनेचा लाभ घेत आहेत.
-धनंजय चाफले
प्रचार्य डायट, चंद्रपूर
बाॅक्स
मराठी, इंग्रजी आणि उर्दू माध्यम
स्वाध्याय योजनेच्या १९ व्या आठवड्यामध्ये मराठी, विज्ञान आणि उर्दू या विषयांना विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थीही यामध्ये सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे,दुर्गम असलेल्या जिवती तालुक्यातील विद्यार्थ्यांनीही या उपक्रमामध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
अशी आहे आकडेवारी
३,२६,५४७
जिल्ह्यातील एकूण विद्यार्थी
२,२१८९१
स्वाध्यायसाठी नोंदणी केलेले विद्यार्थी
११२३१३
स्वाध्याय सोडविणारे विद्यार्थी