नऊ कोरोनामुक्त, एक पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:35 IST2021-09-09T04:35:05+5:302021-09-09T04:35:05+5:30

बाधित आलेला रुग्ण चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील आहे. चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती , ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल , सावली, ...

Nine coronal free, one positive | नऊ कोरोनामुक्त, एक पॉझिटिव्ह

नऊ कोरोनामुक्त, एक पॉझिटिव्ह

बाधित आलेला रुग्ण चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील आहे.

चंद्रपूर तालुका, बल्लारपूर, भद्रावती , ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल , सावली, पोंभूर्णा, गोंडपिपरी , राजुरा , चिमूर, वरोरा , कोरपना व जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही. आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६७१ वर पोहोचली आहे. बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार १० झाली आहे. सध्या ३० बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ८० हजार ८३३ नमुन्यांची तपासणी करण्यात आली त्यापैकी ५ लाख ९० हजार ६५३ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहे. कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, कोरोनाची लस घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Nine coronal free, one positive