नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:00 IST2021-09-02T05:00:20+5:302021-09-02T05:00:20+5:30

बाधित आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २, चंद्रपूर तालुका ४, भद्रावती, राजुरा व सावली तालुक्यात प्रत्येकी ...

Nine corona positive were found | नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नऊ कोरोना पॉझिटिव्ह आढळले

बाधित आढळलेल्या नऊ रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील २, चंद्रपूर तालुका ४, भद्रावती, राजुरा व सावली तालुक्यात प्रत्येकी एका रूग्णाचा समावेश आहे. ब्रम्हपुरी, बल्लारपूर, नागभीड, सिंदेवाही, मूल, पोंभूर्णा, गोंडपिपरी, चिमूर, वरोरा, कोरपना, जिवती तालुक्यात एकही रूग्ण आढळला नाही.

आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या ८८ हजार ६५१ वर पोहोचली आहे. सुरूवातीपासूनच आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या ८७ हजार ६५ झाली आहे. सध्या ४६ बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ६ लाख ७६ हजार ७६८ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ५ लाख ८६ हजार १३९ नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात १५४० बाधितांचे मृत्यू झाले आहेत.

कोरोना पूर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापर, वारंवार हात धुणे व सुरक्षित अंतर राखणे या त्रिसूत्रीचा नियमित वापर करावा, स्वत:ची काळजी घ्यावी, पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

Web Title: Nine corona positive were found