दीक्षाभूमीवर उसळणार निळासागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2017 01:32 IST2017-10-14T01:32:44+5:302017-10-14T01:32:59+5:30
येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबरला होणाºया ६१ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात जिल्ह्यातील ...

दीक्षाभूमीवर उसळणार निळासागर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : येथील दीक्षाभूमीवर दरवर्षी धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळा साजरा होत असून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. १५ व १६ आॅक्टोबरला होणाºया ६१ वा धम्मचक्र अनुप्रवर्तन सोहळ्यात जिल्ह्यातील तसेच बाहेर जिल्ह्यातील बौद्ध अनुयायी सहभागी होणार असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीतर्फे दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला विविध स्तरातून, विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम अभ्यासक उपस्थित राहणार असून यात समारंभाला प्रमुख म्हणून भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई, भदन्त डॉ. वण्णासामी, अरुणाचल प्रदेश आदी मान्यता प्राप्त नामवंतांचा समावेश आहे. १५ आॅक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजता शहराच्या मध्यभागी असलेल्या डॉ. बाबासाहेब यांच्या पुतळ्याला अभिवादन करून विश्वशांती, बंधुत्व प्रेरित वाहनासह मिरवणूक काढण्यात येणार आहे. सायंकाळी ६ वा. धम्मध्वजारोहण होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मेमोरिअल सोसायटीचे अध्यक्ष अरुण घोटेकर राहणार आहे. यावेळी विविध कार्यक्रम होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.