पुढील तीन दिवस राहणार ढगाळ वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:28 IST2020-12-31T04:28:36+5:302020-12-31T04:28:36+5:30
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात ३० डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२१ या पाच दिवसात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहण्याची ...

पुढील तीन दिवस राहणार ढगाळ वातावरण
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हयात ३० डिसेंबर ते ०३ जानेवारी २०२१ या पाच दिवसात आंशिक ढगाळ ते निरभ्र हवामान राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
हरभरा -वाढीची अवस्था घाटे अळीच्या एकात्मिक व्यवस्थापनासाठी प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतामध्ये लावावे, घाटे अळीने आर्थिक नुकसानीची पातळी पार केल्यास नियंत्रणासाठी पहिली फवारणी ५ टक्के निबोंळी अर्क किंवा ३०० पीपीएम अझाडीरेक्टीन मिसळून फवारावे.
कपाशीचे फुटलेल्या बोन्डांची वेचणी पूर्ण करून ते सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. पिवळसर, किडका, कवडीयुक्त तसेच पावसात भिजलेला कापूस वेगळा वेचून अलग साठवावा. वेचणी करतांना कापसाला पालापाचोळा चिकटणारा नाही याची काळजी घ्यावी, गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापणासाठी कापसाची वेचणी झालेल्या क्षेत्रात खोडासह समूळ झाडाची काढणी करून खोल नांगरट करावी व काढलेल्या प-हाटया जाळून नष्ट कराव्या,धान रोपवाटीकेत पेरणीनंतर १५ दिवसांनी तण, कचरा काढून टाकावे व नंतर दर गुंठयास एक किलो युरिया दयावा.रात्रीच्या वेळेस घटलेल्या तापमानाचा भात पिकाच्या रोपांच्या वाढीवर होणा-या विपरीत परिणाम टाळण्यासाठी रात्रीच्या वेळेस प्लास्टिक आच्छादन किंवा भाताचा तनसाचे आच्छादन टाकावे व सकाळी काढून घ्यावे असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी उदय पाटील व कृषी संशोधन केंद्र सिंदेवाही
यांनी केले आहे.