नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्याच

By Admin | Updated: August 26, 2015 00:43 IST2015-08-26T00:43:19+5:302015-08-26T00:43:19+5:30

चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावानजीकच्या विहिरीमध्ये आढळून आला.

Newly married wife committed suicide | नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्याच

नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्याच

मृतदेह नेण्यास नकार : रूग्णालयात तणाव
वरोरा : चार महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या नवविवाहितेचा मृतदेह गावानजीकच्या विहिरीमध्ये आढळून आला. नवविवाहितेची आत्महत्या नसून हत्या आहे, असा आरोप माहेरच्यांनी करीत शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह घेण्यास नकार दिला. त्यामुळे वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी तणावसदृश्य स्थिती निर्माण झाली होती.
वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या वरार येथे दिनकर जीवतोडे यांच्याशी भद्रावती तालुक्यातील पावना (रै) येथील संभाजी जांभुळे यांच्या वृंदा नामक मुलीचा विवाह मे २०१५ मध्ये झाला. वृंदा काही दिवसांपूर्वीच माहेरी आली होती. त्यानंतर सासरी परत गेल्याच्या दोन दिवसानंतर वरार गावानजीकच्या बापू दडमल यांच्या शेतातील विहिरीमध्ये वृंदाचा मृतदेह मंगळवारी सकाळी आढळून आला. मृत वृंदाच्या शरीरावर जखमाही असल्याने तिने आत्महत्या केली नसून तिची हत्या करुन विहिरीत टाकल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला.
मृत वृंदाचा माहेर पावना गावातील नागरिकही उपजिल्हा रुग्णालयात गोळा झाले. जोपर्यंत दोषी असणाऱ्यांंना अटक केली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने उपजिल्हा रुग्णालयात तणाव सदृश्य स्थिती निर्माण झाली होती. या प्रकरणात मृत वृंदाच्या पतीस पोलिसांनी ताब्यात घेतले होते. वृत्त लिहेपर्यंत मृतदेह शवविच्छेदन होवूनही शवविच्छेदन कक्षातच ठेवण्यात आला होता. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Newly married wife committed suicide