पांढरवाणीच्या शेतकऱ्याने शोधले धानाचे नवे वाण
By Admin | Updated: March 1, 2015 02:56 IST2015-03-01T00:46:23+5:302015-03-01T02:56:01+5:30
माणसात जिज्ञासा, शोधवृत्ती आणि परिश्रम करण्याची तयारी असली की तो यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचतो.

पांढरवाणीच्या शेतकऱ्याने शोधले धानाचे नवे वाण
रमेश नान्ने पेंढरी(कोके)
माणसात जिज्ञासा, शोधवृत्ती आणि परिश्रम करण्याची तयारी असली की तो यशाच्या शिखरावर नक्कीच पोहचतो. चिमूर पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नेरी क्षेत्रातील पांढरवाणी या साडेतिनशे लोकवस्तीतील शेतकरी प्रकाश भाऊराव वाघमारे यांनी आपल्या शोधक वृत्तीने नविन बारिक धानाचे वाण शोधून काढले.
या वाणाला आपल्या मोठ्या मुलाचे ‘तेजस’ असे नाव दिले. सदर धानाचे प्रात्यक्षिक त्यांनी स्वत:च्या एक बांधीत यावर्षी केले. त्यात त्यांनी जपानी पद्धतीची रोवणी करून साडेतीन क्विंटल धान पिकविले. अंदाजे एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. या धानावर रोगाचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. याच धर्तिवर गहू व हरभरा जातीच्या वाणाचे संशोधन सुरू आहे. या कार्यात त्यांना त्यांची पत्नी ज्योती प्रकाश वाघमारे, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र सिंदेवाही, मंडळ अधिकारी नेरी, कृषी सहाय्यक सहकार्य करीत आहेत.