ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावर नवे प्लॉटफार्म प्रवाश्यांसाठी खुले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 23:22 IST2018-03-12T23:22:51+5:302018-03-12T23:22:51+5:30
येथील रेल्वे स्थानकावर नव्या उंचीच्या प्लॉटफार्मचे लोकार्पण व फूट ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन शनिवारी रेल्वे स्थानक परिसरात पार पडला.

ब्रह्मपुरी रेल्वे स्थानकावर नवे प्लॉटफार्म प्रवाश्यांसाठी खुले
आॅनलाईन लोकमत
ब्रह्मपुरी : येथील रेल्वे स्थानकावर नव्या उंचीच्या प्लॉटफार्मचे लोकार्पण व फूट ओव्हर ब्रिजचे भूमिपूजन शनिवारी रेल्वे स्थानक परिसरात पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. अशोक नेते होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी आ. प्रा. अतुल देशकर, नगराध्यक्ष योगीता बनपूरकर, जि.प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, पं.स. सभापती प्रणाली मैंद, जिल्हा भाजप उपाध्यक्ष संजय गजपूरे, तालुकाध्यक्ष नानाजी तुपट, युवा नेते परेश शहादाणी, बीआरएम अग्रवाल आदीची उपस्थिती होती.
याप्रसंगी माजी आ. प्रा. देशकर यांनी राखीव काऊंटरची वेळ वाढविणे, सुपरफास्ट गाड्यांचा थांबा मंजूर करणे, रेल्वे स्थानकावर राऊंड सिस्टीम अद्यावत करणे, ब्रह्मपुरी-आरमोरी गेटवर बोगदा तयार करणे आदी मागण्या उपस्थित केल्या.
याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता बनपूरकर, जि. प. उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे यांनीह समस्या अवगत केल्या. त्यानंतर खासदार अशोक नेते यांनी रेल्वे स्थानकावर विशेष लक्ष देण्याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
कार्यक्रमाला भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, ब्रह्मपुरी पालिकेचे नगरसेवक, रेल्वेचे अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिकांची उपस्थिती होती.