नवीन कुनाडा गावाला पाण्याने वेढले
By Admin | Updated: September 18, 2015 00:56 IST2015-09-18T00:56:45+5:302015-09-18T00:56:45+5:30
तालुक्यातील नविन कुनाडा गावाला संततधार पावसामुळे पाण्याने वेढले आहे. जवळपास ३५ ते ४० घरा सभोवताल पाणी साचले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

नवीन कुनाडा गावाला पाण्याने वेढले
३५ ते ४० घरांभोवती पाणी : वृद्ध ताराबाईच्या खाटेखाली पाणीच पाणी
भद्रावती : तालुक्यातील नविन कुनाडा गावाला संततधार पावसामुळे पाण्याने वेढले आहे. जवळपास ३५ ते ४० घरा सभोवताल पाणी साचले असुन अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याठिकाणी नविन कुनाडाचे दुसऱ्यांदा पुनर्वसन झाले आहे. दरवर्षीच पुराचा त्रास पुनर्वसित नागरिकांना सहन करावा लागतो. केसुर्ली - कोंढ्यापासून जो नाला येतो, तो नाला गायधन विंजासन नाल्याला येवून मिळतो. या नाल्याच्या मध्येच कुनाडाचे पुनर्वसन वेकोलिद्वारे करण्यात आले आहे. या नाल्यातले सर्व पाणी कुनाडामध्ये शिरते. सदर जागा वेकोलिने वेकोली कॉलनीसाठी घेतली होती. परंतु या कारणामुळे कॉलनी रद्द करण्यात येवून कुनाडा गावाचे पुनर्वसन करण्यात आले. वेकोलिने हे जाणूनबुजून केले असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. खालील पट्टीतील १५ घरे व वरील भागातील ३० घरे से ४५ घरांना पाण्याने वेढले आहे. भारत बेसेकर यांच्या घरात पाणी घुसले असून त्यांची वद्ध आई ताराबाई बेसेकर ज्या खाटेवर झोपल्या आहेत त्या, खाटेखाली संपूर्ण पाणी आहे. येथील रमेश बावणे, वसंता बावणे, हनुमान शिरपूरकर, सुधाकर बावणे, संदीप बावणे, गजानन हातमनकर, कैलास शिरपूरकर, रमेश सोयाम, पुंडलिक बावणे, नत्थु ढवस, अनिल आसुटकर, अनिल बावणे, पांडूरंग महाजन, पुंडलिक बझारे, धनराज पथाडे, भोजराज पथाडे, गजानन बिपटे, कवडू नंदूरकर, शंकर बिपटे यांच्या घरातदेखील पाणी शिरले आहे. (तालुका प्रतिनिधी)