नव्या सरकारमुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर
By Admin | Updated: November 10, 2014 22:39 IST2014-11-10T22:39:54+5:302014-11-10T22:39:54+5:30
चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय

नव्या सरकारमुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सुकर
मुंबईच्या चमूने केली पाहणी : जिल्हाधिकाऱ्यांशीही चर्चा
चंद्रपूर : चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालयाची घोषणा तर झाली; मात्र घोषणा झाल्यापासून हे वैद्यकीय महाविद्यालयात कोणत्या ना कोणत्या अडचणीतच येत आले. आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक आरोग्य व वैद्यकीय शिक्षण ही खाती काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे असल्याने दोघांमध्ये कधी समन्वय साधला गेला नाही. त्यामुळे निर्माणाधिन १०० खाटांच्या रुग्णालयात सुरू होणारे हे महाविद्यालय ग्रहणात सापडले होते. मात्र आता नव्या सरकारमुळे या महाविद्यालयाचा मार्ग सूकर झाला आहे. मुंबईच्या वैद्यकीय चमूने सोमवारी चंद्रपुरात दाखल होत नव्या इमारतीची व प्रस्तावित जागेचीही पाहणी केली.
चंद्रपूर जिल्हा औद्योगिक जिल्हा म्हणून नावारुपास आला आहे. उद्योग म्हटले की जडवाहतूक, अपघात आलेच. त्यामुळे चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी येथील व आजबाजूच्या परिसरातील नागरिकांची मागणी होती. राज्य शासनाने चंद्रपुरात वैद्यकीय महाविद्यालय देण्याची घोषणा केली. मात्र या जागेला मंजुरी मिळणे व प्रत्यक्ष बांधकाम करून पदभरती करणे, याला बराच कालावधी लागणे अपेक्षित होते. दरम्यान, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून प्रत्येक जिल्ह्यात १०० खाटांच्या रुग्णालयासाठी मंजुरी देण्यात आली होती. या रुग्णालयाचे चंद्रपुरात बांधकामही सुरू झाले होते. त्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयासाठी नवीन इमारत तयार होईपर्यंत १०० खाटांच्या रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात यावे, असा प्रस्ताव आरोग्य विभागाने शासनाला सादर केला. वैद्यकीय महाविद्यालयाची पहिली बॅचचा कालावधी संपेपर्यंत नवीन इमारतीचे बांधकाम केले जावे, असेही ठरविण्यात आले होते. मात्र सार्वजनिक आरोग्य हे खाते काँग्रेसकडे आणि वैद्यकीय शिक्षण हे खाते राष्ट्रवादीकडे असल्याने श्रेयाच्या राजकारणामुळे दोन्ही खात्यांचा एकमेकांसोबत समन्वय साधला नाही. १०० खाटांचे रुग्णालय हे आमचे आहे. वैद्यकीय शिक्षणासाठी नवी इमारत बांधण्यात यावी, अशी भूमिका सार्वजनिक आरोग्य खात्याने घेतली होती. त्यामुळे मागील वर्षीच सुरू होणारे महाविद्यालय सुरू होऊ शकले नाही. आता राज्यात भाजपाची सरकार बसली आहे. वैद्यकीय शिक्षण हे खाते सध्या ना.तावाडे यांच्याकडे आहे. आणि सार्वजनिक आरोग्य खाते स्वत: मुख्यमंत्र्यांकडे आहे. त्यामुळे आता या वैद्यकीय महाविद्यालयाचा मार्ग सूकर झाला आहे. (शहर प्रतिनिधी)