उड्डाणुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:29 IST2021-04-01T04:29:15+5:302021-04-01T04:29:15+5:30
चंद्रपूर : शहरात उड्डाणपूल आहे. मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली ...

उड्डाणुलाच्या देखभालीकडे दुर्लक्ष
चंद्रपूर : शहरात उड्डाणपूल आहे. मात्र त्याच्या देखभाल दुरुस्तीकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता व्यक्त केली जात आहे. येथील वरोरा नाका चौकामध्ये असलेल्या उड्डाणपुलाच्या भितींवर तर मोठ्या प्रमाणाच झुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला भेगा पडत आहे. मात्र सदर झुडपे काढण्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे भविष्यात अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंद्रपूर शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी रस्ते लहान आणि वाहने जास्त अशी काहीशी अवस्था सध्या बघायला मिळत आहे. जिथे तिथे वाहतूक कोंडी होत आहे. यावर मार्ग काढत शहरात काही ठिकाणी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र याकडे संबंधित विभाग लक्ष द्यायला तयार नाही. विशेष म्हणजे, वरोरा नाका चौकामध्ये आजपर्यंत अनेक अपघात झाले असून यामध्ये अनेकांचा जीव गेला आहे. त्यामुळे जुन्या पुलाला नवा समतल पूल बांधून वाहतूक वळविण्यात आली आहे. दरम्यान, डाॅ. आंबेडकर काॅलेजकडे जाणारा पूल तयार असूनही त्याचे अद्यापपर्यंत उद्घाटन झाले नाही. त्यामुळे तुकूम परिसरातील नागरिकांना रामनगर परिसरात येण्यासाठी मोठे अंतर कापावे लागत आहे. संबंधित विभागाने लक्ष देऊन पुलांची नियमित देखभाल करून पुलावरील माती उचलावी, अशी मागमी केली जात आहे.