करवाढीविरुद्धचे आंदोलन दुर्लक्षित

By Admin | Updated: March 12, 2016 01:14 IST2016-03-12T01:14:24+5:302016-03-12T01:14:24+5:30

मनपाने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात मागील पाच दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोेषणाची ...

Neglected movement against tax | करवाढीविरुद्धचे आंदोलन दुर्लक्षित

करवाढीविरुद्धचे आंदोलन दुर्लक्षित

मनपापुढे करणार निदर्शने : आंदोलन तीव्र करणार
चंद्रपूर : मनपाने केलेल्या मालमत्ता करवाढीच्या विरोधात मागील पाच दिवसांपासून भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस लोकशाही आघाडीच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोेषणाची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे आता सोमवारपासून आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार कॉंग्रेसने केला आहे.
आंदोलनाच्या चौथ्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सचिव नगरसेविका सुनीता लोढीया, नगरसेविका रमावती अहीर, लालमुनी यादव, तारावती यादव, अलका रामटेके व ज्योती कवटेकर साखळी उपोषणात सहभागी झाल्या. शुक्रवारी त्यांचे उपोषण सोडविण्यात आले. त्यानंतर डॉ.महावीर सोईतकर, अशोक नागापुरे यांच्यासह ओबीसी विभागाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र बेले व भटक्या विमुक्त जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रतन शिलावार साखळी उपोषणात सहभागी झाले. या आंदोलनाला चंद्रपूर चेंबर आॅफ कॉमर्स, महाराष्ट्र लोकशाही आघाडीसह अनेक संघटनांनी व नागरिकांनी व्यक्तिश: उपोषण मंडपाला भेट देऊन आपला पाठिंबा जाहीर केला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Neglected movement against tax