शेतमजुराचा मुलगा नीरज देशसेवेसाठी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:31+5:302021-03-13T04:52:31+5:30

वडिलांच्या निधनानंतर जिद्दीने मिळवले यश घोसरी : घरची परिस्थिती हलाखीची. जेमतेम दोन एकर शेती. घरच्यांवर शिक्षणासाठी काढलेले कर्ज. मोठा ...

Neeraj, the son of a farm laborer, is ready for national service | शेतमजुराचा मुलगा नीरज देशसेवेसाठी सज्ज

शेतमजुराचा मुलगा नीरज देशसेवेसाठी सज्ज

वडिलांच्या निधनानंतर जिद्दीने मिळवले यश

घोसरी : घरची परिस्थिती हलाखीची. जेमतेम दोन एकर शेती. घरच्यांवर शिक्षणासाठी काढलेले कर्ज. मोठा भाऊ आर्मीत असल्यामुळे घरची परस्थिती बदलणार या विचारात असताना वडिलांचे निधन झाले. अशा स्थितीत नीरज मनोहर ढोंगे याने जिद्दीने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.

नीरजचे प्राथमिक शिक्षण मूल तालुक्यातील पिपरी दीक्षित येथे झाले. महाविद्यालयीन शिक्षण मूलला झाले. अशातच हातावर आणून पानावर खाणे अशी परिस्थिती असल्यामुळे शेती सांभाळत तसेच मजुरी करत यशवंतराव मुक्त विद्यापीठातून पदवी मिळवली.

मोठा भाऊ सुरज ढोंगे इंडियन आर्मीत दाखल झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. कुटुंबात आई - वडील दोन भाऊच असल्यामुळे गोड स्वप्न रंगवू लागले. स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल असताना वडिलांचा २०१९ मध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. दुचाकीने जात असताना त्यांना एका चार चाकी वाहनाने मागून धडक दिली. पुढे आईची तब्बेत साथ देत नव्हती. घरची जबाबदारी नीरजवर आली. भरतीचा सराव सोडून शेतीसोबत मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागला. नीरजने सैन्य भरतीचा सराव सोडला. मात्र, प्रयत्न सोडले नव्हते.

त्याने पुन्हा सीआरपीएफची परीक्षा दिली. फिजिकल दिली व २० फेब्रुवारीला निकाल लागला. त्यात नीरजची निवड झाली. त्याच्या मेहनतीला यश प्राप्त झाले.

कोट

आई - वडिलांचे कष्ट व त्याग डोळ्यांपुढे होते. अनेकदा भरतीत अपयश आले. तरीही मनात आत्मविश्वास व जिद्द असल्यामुळे यश मिळवता आले.

-नीरज ढोंगे.

Web Title: Neeraj, the son of a farm laborer, is ready for national service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.