शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

कपाशीच्या शेतीसाठी दक्षता घेण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 23:10 IST

कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.

ठळक मुद्देकुणाल खेमनार : जिल्हाधिकारी कार्यालयात जागृती कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान करणाऱ्या शेंदरी बोंडअळीचा संपूर्ण नायनाट करण्यासाठी डिसेंबरनंतर कोणत्याही शेतकºयांनी फरदड कापूस घेऊ नये, असा सल्ला जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी दिला. जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत साफल्य भवनात पार पडलेल्या फरदड कापूस मुक्त गाव अभियान कार्यशाळेत ते बोलत होते.यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे किटकशास्त्रज्ञ प्रा. प्रवीण देशपांडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. उदय पाटील, कृषी उपसंचालक ए. व्ही. भालेराव, सांख्यिकी अधिकारी राज वानखेडे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. खेमनार म्हणाले, फरदड कापूसमुक्त गाव अभियान योजनेमध्ये महसूल, जिल्हा परिषद आणि कृषी विभागाच्या कर्मचाºयांनी सहभागी व्हावे. मोहिमेचे स्वरूप व्यापक करण्यासाठी ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदच्या पदाधिकाºयांनी सहभागी करून अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असेही त्यांनी सांगितले.शेंदरी बोंडअळीचा मागील वर्षी मोठ्या प्रमाणात प्रादूर्भाव दिसून आला होता. त्याविरूद्ध जागृती केल्याने शेतकरी बांधवांनी चांगला प्रतिसाददिला. यावर्षी बोंडअळीचा प्रादूर्भाव नगण्य दिसून आला आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम २०१८-१९ मध्ये शेतकºयांना विमा काढण्यासाठी जाणीव जागृती करण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. शेतकºयांनी यंत्राच्या अनुदानासाठी १५ जानेवारी २०१९ पर्यंत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज करावेत, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी दिली.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. खेमनार यांच्या हस्ते फरदड कापूसमुक्त गाव अभियान विषयावरील भित्तीपत्रक व पत्रकांचे अनावरण करण्यात आले.बोंडअळीच्या उच्चाटणासाठी उपायपीक काढणीनंतर कपाशीच्या पऱ्हाटी व व्यवस्थित न उपडलेली क्रीडग्रस्त बोंडे व पालापाचोडा नष्ट करून शेत स्वच्छ ठेवावे. पीक काढणीनंतर जमिनीची खोल नांगरट करावी. त्यामुळे जमिनीवर आलेले किडीचे कोष तसेच इतर अवस्थेत असलेली अळी नष्ट होईल. जिनिंग, प्रेसिंग मिल तसेच कापूस साठवण केलेल्या जागी कामगंध सापळे (फेरोमन ट्रॅप्स) लावावेत. डिसेंबर महिन्यानंतर शेत ५ ते ६ महिने कापूस पीक विरहित ठेवल्यास गुलाबी बोंडअळीचे जीवनक्रम संपुष्टात येते. कपाशीच्या पऱ्हाठीत सुप्त अवस्थेत बोंडअळी राहते. ही पऱ्हाठी गंजी करुन बांधावर ठेवू नये. त्या पिकाचा चुरा करण्यासाठी ग्रेडर यंत्राचा वापर करावा, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. पाटील यांनी यावेळी दिली.