बल्लारपुरातील चौकांमध्ये गतिरोधकाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:26 IST2021-01-18T04:26:01+5:302021-01-18T04:26:01+5:30
बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, ...

बल्लारपुरातील चौकांमध्ये गतिरोधकाची गरज
बल्लारपूर : शहरात झालेले प्रशस्त रोड, त्यावर सुसाट वेगाने धावणाऱ्या वाहनांची वर्दळ आणि विविध चौकांत गतिरोधक नसल्यामुळे वाढलेले अपघात, याची धास्ती घेऊन बल्लारपूरच्या नागरिकांनी चौकाचौकांत गतिरोधक बनविण्याची मागणी बांधकाम विभागाकडे केली आहे.
शहरातून राष्ट्रीय मार्ग गेल्यामुळे वाहनांची वर्दळ वाढली आहे. पेपर मिल ते बामणीपर्यंत अनेक चौक येतात. परंतु, या चौकात गतिरोधक नसल्यामुळे अपघातात वाढ झाली आहे. सामाजिक कार्यकर्ता रॉकी कांबळे यांनी सांगितले की आधी अनेक ठिकाणी गतिरोधक होते. परंतु ते काढण्यात आले आहे, त्या ठिकाणी पुन्हा गतिरोधक बनविण्याची आवश्यकता आहे. पेपर मिल, कलामंदिर, मिल गेट समोर, बालाजी काॅम्प्लेक्स समोर, नवीन बसस्थानकजवळ, जुना बस स्टॅन्डसमोर, सरकारी डेपोजवळ, बीटीएस प्लॉट मार्गावर, दिलासाग्राम, शाळेसमोर वस्ती विभागात गांधी पुतळ्याजवळ गतिरोधक जरुरी आहे.
बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन गतिरोधक बनविण्याची मागणी विशाल रामटेके, शरद वानखेडे, कुणाल आवळे, प्रतीक खोब्रागडे, आनंद गोंगले, प्रेम नगराळे, धम्मदीप वाळके, सुरेश वेलेकर, अजय रंगारी, विजय भैसारे, प्रशांत गोरघाटे, प्रफुल नगराळे, गौतम डांगे, प्रेमजित, उपरे विनय चिवंडे यांनी केली आहे.