आंबेडकरी समाजाने संघटित होण्याची गरज - सुरेश माने
By Admin | Updated: February 1, 2016 01:03 IST2016-02-01T01:03:40+5:302016-02-01T01:03:40+5:30
बहुजन रिपब्लिकन ऐक्य मंचातर्फे बहुजन रिपब्लिकन कन ऐक्य परिषदचे स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजन करण्यात आले ंहोते.

आंबेडकरी समाजाने संघटित होण्याची गरज - सुरेश माने
भद्रावतीत आयोजन : बहुजन रिपब्लिकन ऐक्य परिषद
भद्रावती : बहुजन रिपब्लिकन ऐक्य मंचातर्फे बहुजन रिपब्लिकन कन ऐक्य परिषदचे स्थानिक शिंदे मंगल कार्यालयात गुरूवारी आयोजन करण्यात आले ंहोते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. सुरेश माने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून दशरथ मडावी, प्रा. कोमल खोब्रागडे, राजु झोडे, अॅड. भुपेंद्र रायपुरे, इंजि. मोनल भडके आदी मान्यवर उपस्थित होते.
जातीयवादी व्यवस्थेमुळे रोहीतला जीव गमवावा लागला. आता यापुढे दुसरा रोहीत जाता कामा नये, याची दक्षता आंबेडकरी समाजाने घेतली पाहिजे. आमचा सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक संघर्ष आहे, असे प्रास्ताविकातून अॅड. भूपेंद्र रायपुरे यांनी सांगितले. आंबेडकरी चळवळ महाराष्ट्रात यशस्वी झाली तर संपूर्ण भारतात यशस्वी होईल. म्हणून महाराष्ट्रात आंबेडकरी समाजाने संघटित होऊन ही चळवळ यशस्वी करण्याची गरज असल्याचे डॉ. माने आपल्या सांगितले. महाराष्ट्रात आंबेडकरी विद्वानांची ताकद मोठी आहे. लेखक, गायक, साहित्यिक, वकील, इंजिनियर यांची ताकद मोठी आहे. मग राजकारणात का नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राजकारणात ताकद निर्माण करण्यासाठी संघटना मजबूत करावी लागेल असे प्रतिपादन त्यांनी केले. संचालन रवि तुलतुंबडे यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)