घुग्घुसमध्ये सीसीटीव्ही लावण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:27 IST2021-03-06T04:27:17+5:302021-03-06T04:27:17+5:30
जिल्हा प्रशासनाने चौकाचौकांत आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. घुग्घुस शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर ...

घुग्घुसमध्ये सीसीटीव्ही लावण्याची गरज
जिल्हा प्रशासनाने चौकाचौकांत आणि महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
घुग्घुस शहर हे जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर असून, कोल सिटी, मिनी भारत म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी सर्व भाषिक सर्व प्रांतिक लोकांचे वास्तव्य आहे. जिल्ह्यात दारुबंदी असली तरी गाव परिसरात ठिकठिकाणी दारू, सट्टा, जुगार, रेती तस्करी, रस्त्यावर चिडीमारीचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. तसेच अपहरण, चोऱ्या व घरफोडीच्या घटनांच आलेख वाढत आहे.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे रस्त्यारस्त्यावर, चौकाचौकांत लावल्यानंतर बरीच गुन्हेगारी कमी होण्याची शक्यता आहे.