चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज -शरद पवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 12:51 IST2017-11-16T12:50:00+5:302017-11-16T12:51:35+5:30
चंद्रपूर हा कामगार व कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील एकूण उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेले दिसत आहेत. या समस्येकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले.

चंद्रपूर जिल्ह्याकडे राज्यकर्त्यांनी लक्ष देण्याची गरज -शरद पवार
ठळक मुद्देभविष्यात बिकट समस्या निर्माण होण्याची केली शक्यता व्यक्तविविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत साधला संवाद
आॅनलाईन लोकमत
चंद्रपूर- चंद्रपूर हा कामगार व कष्टकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील एकूण उद्योगांपैकी अनेक उद्योग बंद पडलेले दिसत आहेत. या समस्येकडे राज्यकर्त्यांनी वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात ही परिस्थिती अधिक बिकट होईल असे परखड मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे व्यक्त केले. यावेळी त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.