शेतकरी हितासाठी कृषी न्यायाधिकरणाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:54+5:302021-01-10T04:20:54+5:30
यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार व शेती प्रश्नांचे अभ्यासक ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण ...

शेतकरी हितासाठी कृषी न्यायाधिकरणाची गरज
यावेळी आमदार सुभाष धोटे, माजी आमदार व शेती प्रश्नांचे अभ्यासक ॲड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर, नगराध्यक्ष अरुण धोटे, सुमनताई प्रभाकर मामुलकर आदींची उपस्थिती होती.
नव्या कायद्यातील उणिवा दूर करण्यासाठी कृषी न्यायाधिकरणाची गरज अधोरेखित करणारे हे महत्त्वपूर्ण व दिशादर्शक पुस्तक असल्याचे मत माजी आमदार ॲड. चटप यांनी व्यक्त केले.
कृषी कायद्याविषयी आंदोलन सुरू असताना ॲड. दीपक चटप यांनी कायद्याविषयी सोप्या भाषेत चिकित्सा या पुस्तकात केली आहे. नव्या कृषी कायद्यावरील हे पहिलेच पुस्तक आहे. कायदे पारित करण्याच्या प्रक्रियेबाबत प्रश्न विचारले पाहिजेत. या नव्या पुस्तकातून शेतकरीहित साधले जावे, ही अपेक्षा आमदार सुभाष धोटे यांनी व्यक्त केली.
कायदा हा कोरडवाहू शेतीसारखा असतो, त्याची योग्य अंमलबजावणी झाली तरच ओलीत होते. न्याय मागण्याच्या प्रक्रियेतील दुरुस्ती व कायद्यात काही पळवाटा असल्या तरी संपूर्ण कायद्याला विरोधाऐवजी सकारात्मक उपाय सुचवावे, असे मत लेखक दीपक चटप यांनी मांडले. संचालन आनंद चलाख यांनी केले. अनिल बाळसराफ यांनी आभार मानले.