भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

By Admin | Updated: March 16, 2016 08:35 IST2016-03-16T08:35:22+5:302016-03-16T08:35:22+5:30

राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक गांधी चौकात निदर्शने करण्यात आली.

NCP's protest against the arrest of Bhujbal | भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

भुजबळांच्या अटकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीची निदर्शने

चंद्रपूर: राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते छगन भुजबळ यांच्या अटकेच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे मंगळवारी स्थानिक गांधी चौकात निदर्शने करण्यात आली. या आंदोलनाचे नेतृत्व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष शशिकांत देशकर यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राजेंद्र वैद्य, जिल्हा ग्रामीण शहर अध्यक्ष संदीप गड्डमवार, ज्येष्ठ नेते हिराचंद बोरकुटे, नगरसेवक संजय वैद्य, जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्ष बेबी उईके, ज्योती रंगारी, सुरेश रामगुंडे, डी.के. आरीकर, प्रियदर्शन इंगळे, निमेश मानकर, सुनील काळे, बब्बू ईसा, संजय तुरीले, प्रतीक भगत, राजेंद्र नागरकर, महेंद्र लोखंडे, प्रशांत चिप्पावार, सतीश मिनगुलवार यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: NCP's protest against the arrest of Bhujbal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.