नगरपालिकेवर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा

By Admin | Updated: April 3, 2016 03:50 IST2016-04-03T03:50:05+5:302016-04-03T03:50:05+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडचांदुरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता शनिवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला.

NCP's front against the municipal corporation | नगरपालिकेवर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा

नगरपालिकेवर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा

नगराध्यक्षांना निवेदन : २७ समस्यांकडे वेधले लक्ष
गडचांदूर : राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गडचांदुरातील विविध समस्यांकडे लक्ष वेधण्याकरिता शनिवारी नगरपालिकेवर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान नगराध्यक्ष विद्या कांबळे यांना गडचांदुरातील २७ समस्यांचे निवेदन देण्यात आले.
या मोचार्चे नेतृत्व जिल्हा परिषद सदस्य अरुण निमजे यांच्या मार्गदर्शनात नगर परिषदेतील विरोधी पक्षाचे गटनेते निलेश ताजणे व शहर अध्यक्ष अरुण डोहे यांनी केले. मोर्चात नगरसेवक शेख हापीज अब्दुल गणी, शरद जोगी, कल्पना निमजे, सुरेखा गोरे, विजयालक्ष्मी डोहे, शांताबाई मोतेवाड आदींचा सहभाग होता. गडचांदुरात अनेक समस्या असून नगरपरिषद त्याकडे दुर्लक्ष करतात. सदर समस्या त्वरित सोडवाव्या, अशी मागणी याप्रसंगी करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)
राजकीय नैराश्यातून मोर्चा - सचिन भोयर
राष्ट्रवादी काँग्रेसने मोर्चाचे आयोजन करून २७ समस्या मांडल्या आहेत. निवेदनात अशाच समस्या मांडल्या, ज्या येत्या ३-४ महिन्यात सुटणार आहे. शहरात जोरदार कामे सुरू असून विरोधकांना पचनी पडत नसल्याचे दिसते. राष्ट्रवादीने मोर्चा काढल्यामुळे ही कामे झाली म्हणून कामांचे श्रेय घेण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचा आरोप शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा उपनगराध्यक्ष सचिन भोयर यांनी केला आहे. (वार्ताहर)

Web Title: NCP's front against the municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.