शंकरपूर येथे लवकरच नायब तहसीलदार कार्यालय देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2016 00:51 IST2016-04-25T00:51:01+5:302016-04-25T00:51:01+5:30

शंकरपूर हे गाव मोठे असून चिमूरपासून २५ कि.मी. अंतर असल्याने गावकऱ्यांच्या सोयीसाठी लवकरच अतिरिक्त नायब तहसीलदारांचे ...

Nayab tehsildar office will soon be given in Shankarpur | शंकरपूर येथे लवकरच नायब तहसीलदार कार्यालय देणार

शंकरपूर येथे लवकरच नायब तहसीलदार कार्यालय देणार

कीर्तीकुमार भांगडिया : शिष्टमंडळाने घेतली भेट
शंकरपूर : शंकरपूर हे गाव मोठे असून चिमूरपासून २५ कि.मी. अंतर असल्याने गावकऱ्यांच्या सोयीसाठी लवकरच अतिरिक्त नायब तहसीलदारांचे कार्यालय देणार असल्याचे आश्वासन आमदार कीर्तीकुमार भांगडिया यांनी शिष्टमंडळाला रविवारी दिले.
शिष्टमंडळाशी चर्चा करताना ते म्हणाले, नवीन तालुके अथवा जिल्ह्याची घोषणा सध्यातरी शासन करणार नाही. विकास हा टप्प्याटप्प्याने करायचा आहे. त्यामुळे पहिल्या टप्यात भिसी येथे अतिरिक्त नायब तहसील कार्यालय १ मेपासून सुरू होणार आहे. शंकरपूर येथील तालुक्याची मागणी जुनी आहे. त्यामुळे येथे नायब तहसीलदाराचे कार्यालय देणार असून ज्यावेळी शासन नवीन तालुक्याची घोषणा करेल, त्यावेळी शंकरपूर तालुका करण्यात येईल.
तसेच भिसी येथे अतिरिक्त तहसील कार्यालयाला शंकरपूर राजस्व मंडळ जोडण्यात येणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
शंकरपूर तालुका संघर्ष समितीच्या वतीने शंकरपूर तालुका करण्यासाठी आंदोलन करण्याचे असल्याने त्या पार्श्वभूमीवर त्यांनी संघर्ष समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. यावेळी शिष्टमंडळाने त्यांना निवेदन देण्यात आले.
शिष्टमंडळात अध्यक्ष प्रा. विजय टिपले, मनोहर रंदये, किशोर जयस्वाल, श्यामराव शेंडे, भाऊराव बावणकर, पप्पू बजाज, अमोद गौरकर, युवराज मुरस्कर, इम्तीयाज शेख, राजू रासेकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Nayab tehsildar office will soon be given in Shankarpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.