नवरगाव-खुटाळा-नेरी रस्त्याची दुरवस्था
By Admin | Updated: March 8, 2015 00:37 IST2015-03-08T00:37:30+5:302015-03-08T00:37:30+5:30
नवरगाव-पेंढरी-खुटाळा-नेरी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

नवरगाव-खुटाळा-नेरी रस्त्याची दुरवस्था
पेंढरी (कोके) : नवरगाव-पेंढरी-खुटाळा-नेरी रस्त्याची दूरवस्था झाली आहे. यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
चिमूर-नेरी-नवरगाव-सिंदेवाही या २६८ राज्यमार्गावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. या मार्गावरून जवळ अंतर पडत असल्यामुळे मूल, सिरोंचा, चामोर्शी, मार्कंडा, गडचिरोली, वरोरा, वर्धा, देवळी, अमरावती, वणी यवतमाळ, हिंगणघाट, समुद्रपूर आदी शहराला जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. परंतु हा रस्ता अतिशय अरुंद आहे. हा रस्ता ठिकठिकाणी उखडलेला आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून रात्री ये-जा करणाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हिच परिस्थिती नेरी-सिरपूर-तळोधी व खुटाळा - गोखट- काजळसर रस्त्याची आहे. या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी अनेकवेळा संबंधितांना निवेदन देण्यात आले. मात्र कोणताही उपयोग झाला नाही. (वार्ताहर)