लग्नात नवरदेव पोहोचलाच नाही
By Admin | Updated: April 22, 2016 02:52 IST2016-04-22T02:52:15+5:302016-04-22T02:52:15+5:30
दोन बहिणींचे लग्न एकाच मंडपात करण्यासाठी वधु पित्याने तयारी पूर्ण केली. लग्नाचा दिवस उजाडला. मात्र एका

लग्नात नवरदेव पोहोचलाच नाही
चिमूर : दोन बहिणींचे लग्न एकाच मंडपात करण्यासाठी वधु पित्याने तयारी पूर्ण केली. लग्नाचा दिवस उजाडला. मात्र एका मुलीचा नियोजित वर लग्नमंडपात पोहोचला तर दुसरा पोहोचलाच नाही. त्यामुळे नवरदेवा विरूद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची घटना चिमूर तालुक्यातील उसेगाव येथे गुरूवारी घडली.
उसेगाव येथील बापुराव चांदेकर यांच्या दोन मुलींचे लग्न २१ एप्रिलला ठरले होते. मोठ्या मुलीसाठी जांभुळघाट येथील तर लहान मुलीचा गदगाव येथील वर ठरले होते. सर्व आमंत्रित व निमंत्रीत पाहुणे मंडळी उसेगाव येथे आली आणि जांभुळघाट येथील मोठ्या मुलीचा वरही मंडपात हजर झाला. मात्र लहान मुलीचा गदगाव येथील विकास भाऊराव चौधरी हा नियोजीत वर लग्न मंडपात पोहोचलाच नाही. त्यामुळे वधु पक्षाकडील मंडळीमध्ये चिंता पसरली.
अखेर प्रतीक्षा करूनही नवरदेव मंडपात न पोहोचल्याने चांदेकर यांनी चिमूर पोलीस ठाणे गाठून विकास चौधरी यांच्याविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी वरावर गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. मोठ्या बहिणीचा लग्न लागला मात्र लहान बहिनीचा हिरमोड झाल्याने पोलीस काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागून आहे. (प्रतिनिधी)