नवरगाव येथे १७ जागेसाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:20 IST2021-01-10T04:20:41+5:302021-01-10T04:20:41+5:30

तालुक्यात सिन्देवाही नगरपंचायत झाल्यानंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत नवरगाव असून १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे तीन गट ...

In Navargaon, 48 candidates are contesting for 17 seats | नवरगाव येथे १७ जागेसाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात

नवरगाव येथे १७ जागेसाठी ४८ उमेदवार निवडणुक रिंगणात

तालुक्यात सिन्देवाही नगरपंचायत झाल्यानंतर सर्वात मोठी ग्रामपंचायत नवरगाव असून १५ जानेवारी रोजी होऊ घातलेल्या निवडणुकीत नेहमीप्रमाणे तीन गट निवडणुक रिंगणात आहेत. यामध्ये भाजपाप्रणित गट सर्व १७ जागा लढवीत आहे. काँग्रेसप्रणित गट १७ जागा लढविण्याच्या तयारीत असताना एका उमेदवाराचा फार्म कटल्याने १६ जागा लढवीत आहे. गोपाल चिलबुले गट १२ जागा लढवीत आहे. नवरगावच्या इतिहासात प्रथमच दादाजी चनबनवार हे स्वतंत्र निवडून आले होते. याची जाण ठेऊन यावेळी तीन स्वतंत्र उमेदवार असे एकूण ४८ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब अजमावीत आहेत. नवरगाव ग्रामपंचायत अंतर्गत एकूण ७७३६ मतदार संख्या असून यामध्ये पुरुष मतदार संख्या ३८७९ तर स्ञी मतदार संख्या ३८५८ आहे. तीन गट आणि तीन स्वतंत्र उमेदवार यांच्या लढाईत कोण बाजी मारतो याकडे ग्रामवासीयांचे लक्ष लागलेले आहे.

Web Title: In Navargaon, 48 candidates are contesting for 17 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.