शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

निसर्गाने नटलेले गाव समस्यांनी वेढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:22 IST

जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.

ठळक मुद्देशासनाचे दुर्लक्ष :पावसाळ्यात गावाचा तुटतो संपर्क

संघरक्षित तावाडे।लोकमत न्यूज नेटवर्कजिवती : जिवती पंचायत समिती अंतर्गत येणारी धनकदेवी ग्रामपंचायत ही शंभर टक्के आदिवासी ग्राम पंचायत असून याअंतर्गत सहा गावांचा समावेश होतो. धनकदेवी, मरकागोंदी, कारगाव बु., कारगाव खु. पाटागुडा आणि जांभूळधरा ही सहा गावे जंगलात असून निसर्ग सानिध्यात आहेत. यापैकी २५ घरांची वस्ती असलेले पाटागुडा गाव डोंगराच्या पायथ्याशी तसेच दुसऱ्या बाजुला पकडीगुडम तलावाला लागूनच वसले आहे. ही गावे मागील अनेक वर्षांपासून विविध समस्यांनी ग्रस्त आहेत.पाटागुडा गाव शंभर टक्के आदिवासी असून या गावात शासनाच्या योजना पोहचल्याच नाही. रस्ते, आरोग्य, शिक्षण, पाणी या समस्यांनी एकप्रकारे गावाला वेढलेले दिसून येते. या गावात जातो म्हटले तर पक्का रस्ता नाही. कच्चा रस्ता असून रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. जाणाऱ्या रस्त्यावर छोटे - छोटे नाले असून आजही नाल्यातून पाणी वाहत आहे.एवढेच नाही तर पावसाळ्यात या गावाचाच संपर्क तुटतो, ही वास्तविकता आहे. गावाच्या बाहेर लागूनच एक विहीर आहे. पण पाणी मात्र गढूळ आहे. यात ब्लिचींग पावडरसुद्धा टाकत नसून याच खराब पाण्यावर गावकºयांना तहान भागवावी लागत असल्याचे गावकºयांनी प्रस्तुत प्रतिनिधीजवळ व्यथा मांडली. गावात आरोग्य सेवक आरोग्याची तपासणी करायला येत नाही. एवढेच काय तर पावसाच्या दिवसात गावात आरोग्याची तसेच रूग्णाची बिकट परिस्थिती असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.गावाला रस्ता नसल्याने आमच्या लहान - लहान मुलांना प्राथमिक शिक्षणापासूनच बाहेरगावला शाळेत शिकायला ठेवावे लागते, अशी खंतही गावकऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.धणकदेवी ग्रामपंचायत मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतले असले तरी याच अंतर्गत येणाऱ्या पाटागुड्यात मात्र समस्या पाहायला मिळतात. आॅगस्ट महिन्यात झालेल्या ग्रामसभेत या गावासाठी रस्त्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचे कळले. या क्षेत्राच्या पंचायत समिती सदस्य अनिता सुग्रिव गोतावळे यांनी पाटागुडा गावासाठी दीड किमी रस्ता बांधकामासाठी सतत अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला.परंतु, निधीची उपलब्धता नसल्याचे कारण सांगत आजपर्यंत हा रस्ता मंजूर करण्यात आलेला नाही. एकंदरीत निसर्गाने नटलेले हे गाव समस्येने वेढले आहे, असेच म्हणावे लागेल.चिमुकल्यांच्या शिक्षणाची काळजी कोण घेणार?गावात शाळा नसली तरी मुलांना जवळच्या गावात जाऊन शिकायला पाठवितो म्हटल्यास चांगला रस्ता नाही. रस्त्यावरून पावसाच्या दिवसात पाणी वाहत असते. मग मुलांना कसे पाठवावे, हा पालकांचा प्रश्न आहे. शासन शिक्षणावर भर देत असले तरी पाटागुड्यासारख्या गावातील आदिवासी चिमुकल्यांच्या शिक्षणाचे काय, हा प्रश्न पडतो. प्राथमिक शिक्षणापासूनच चिमुकल्या मुलांना बाहेरगावी शिक्षणासाठी पाठवावे लागते, ही मोठी शोकांतिका आहे.गावात अनेक समस्या असून यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा सुरू आहे. रस्त्याची समस्या मुख्य असून ही समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व शासनाने पावले उचलावी.-अविनाश मडावी, ग्रामस्थ, पाटागुडा